सप्तशृंगी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश खाबिया

By Admin | Updated: September 3, 2016 23:17 IST2016-09-03T23:14:38+5:302016-09-03T23:17:13+5:30

सप्तशृंगी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश खाबिया

Prakash Khabia as President of Saptashrighi Credit Society | सप्तशृंगी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश खाबिया

सप्तशृंगी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश खाबिया

वणी : दिंडोरी तालुक्यातील अग्रमानांकित सप्तशृंगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश खाबिया तर उपाध्यक्षपदी हैदरभाई मुलाणी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पाडण्यात आली. १९९१ साली संस्थेची स्थापना करण्यात आली असून १४५० सभासद आहेत. ३५ लाख रुपये भागभांडवल असून २१ कोटी रु पयांच्या ठेवी आहेत. ११ कोटी रुपयांचे कर्जवाटप असून २१ कोटी रु पयांच्या ठेवी आहेत. १२ कोटी रुपये गुंतवणूक असून अहवाल सालात ३१ लाख रु पयांचा नफा संस्थेला झाला आहे. सभासदांना भेटवस्तू वाटप व विविध सामाजिक उपक्र मांसाठी संस्थेने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. निवडप्रसंगी नवनिर्वाचित संचालक अशोक पवार, महेंद्र समदडिया, गोविंद थोरात, किशोर बोरा, चंद्रकांत सोनवणे, अरुण खांडे, पुष्पा चोपडा, विमल कड, पांडुरंग कोकाटे, जयसिंग पवार, नंदकुमार झोटिंग, कार्यालयीन अधिकारी ब्राह्मणकर जगन पाचपेंड आदि उपस्थित होते.

Web Title: Prakash Khabia as President of Saptashrighi Credit Society