महावितरणकडून वीजचोरी शोध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:52 IST2020-07-07T13:52:33+5:302020-07-07T13:52:57+5:30
ब्राह्मणगाव : येथे दररोज सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले असून वाढत्या दाबामुळे वीज खंडित होत असल्याने वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातून घरोघरी शोध मोहीम हाती घेतली.

महावितरणकडून वीजचोरी शोध मोहीम
ब्राह्मणगाव : येथे दररोज सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले असून वाढत्या दाबामुळे वीज खंडित होत असल्याने वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातून घरोघरी शोध मोहीम हाती घेतली.
गावात सायंकाळी दररोज वीजपुरवठा खंडित होतो. तसेच वातावरणात अद्याप उष्मा असल्याने लहान मुले ,वयस्कर व्यक्ती यांचे अधिक हाल होत असतात. याबाबत ग्राहक सतत सबंधित खात्याकडे तक्र ार करत होते. याची दखल घेत वीज वितरण कंपनीचे उपअभियंता दीपक गांगुर्डे व त्यांचे सहकारी यांनी मंगळवारी सकाळीच गावातून वीज चोरीची शोध मोहीम हाती घेतली. त्यासोबतच वीज बिल भरणा तसेच ग्राहकांच्या समस्या जाणून घेत कोरोना मुळे ग्राहकांचे उत्पन्न घटल्याने पूर्ण वीज बिल भरणे शक्य नसेल तर बिलात दोन हप्ते करून भरण्याचे आवाहन केले.