Power Company to issue notice to power company | वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावणार
वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावणार

ठळक मुद्देस्थायी समिती : कृषी खात्याच्या तक्रारींची दखल

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले असून, वीज कंपनीविषयी ग्रामीण भागातील तक्रारींची दखल घेत या संदर्भात ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान, कृषी खात्याच्या कामकाजाविषयी सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत कृषी खात्याच्या कार्यक्रमांची माहिती सदस्य, पदाधिकाºयांना देण्याच्या सूचनाही सांगळे यांनी दिल्या.
स्थायी समितीच्या सभेत वीज कंपनीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे ग्रामीण भागात शेकडो विजेचे खांब पडून विजेच्या तारा तुटल्या आहेत. यातील काही पोल तर दोन वर्षांपूर्वीच वीज कंपनीने बसविले होते. असे पोल तुटून पडले तर जुने पोल तसेच कायम राहिल्याची तक्रार आत्माराम कुंभार्डे यांनी केली. भास्कर गावित यांनी पेठ तालुक्यासाठी वीज कंपनीने नवीन दोन हजार पोल दिल्याचे सांगण्यात आले; परंतु ते पोल कुठे बसविले, विजेच्या तारा कुठे गेल्या याचा पत्ताच लागला नसल्याचा आरोप केला. सभापती मनीषा पवार यांनी सौंदाणे गटात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत, तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नसल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्ष शीतल सांगळे यांनी गैरहजर असलेल्या वीज कंपनीच्या अधिकाºयांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. तसेच वीज कंपनीच्या तक्रारींची स्थानिक पातळीवर दखल घेतली जात नसल्याने थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.
प्रभारी कृषी अधिकाºयांनी, जिल्ह्यात सतरा भरारी पथके गठित करण्यात आली असून, गुणवत्ता नियंत्रकदेखील असल्याचे सांगितले. शेतकºयांमध्ये या विषयांवर जनजागृती करण्यासाठी गावोगावी मेळावे घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतले.
मेळावे घेताना त्याची माहिती सदस्य, पदाधिकाºयांनाच नसेल तर शेतकºयांना कसे कळते, असा सवाल केला.
बियाणे, खतांबाबत
सदस्यांची विचारणा
कृषी खात्याच्या कामकाजाचा आढावा घेताना भास्कर गावित यांनी, सध्या पेरणीचे दिवस असून, काही कंपन्यांकडून शेतकºयांना बोगस बी-बियाणे, खतांची विक्री केली जाऊ शकते त्यावर कृषी खाते काय कार्यवाही करते अशी विचारणा केली. बाळासाहेब क्षीरसागर यांनी खराब बियाणांची विक्री करणाºया कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याला आहे काय? सध्या किती कंपन्या अशा प्रकारच्या बियाणांची विक्री करीत आहेत, असा सवाल केला.


Web Title: Power Company to issue notice to power company
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.