टपाल तिकिटांचा नाशिककरांनी अनुभवला दुर्मिळ प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:33 IST2018-10-21T00:33:25+5:302018-10-21T00:33:43+5:30
टपाल तिकिटे म्हटली की सर्वांनाच त्यांचे आकर्षण अन् औत्सुक्य... जगाच्या पाठीवर हा टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद तसा लोकप्रियच... छंदांचा राजा अन् राजांचा छंद असे या छंद बाळगणाऱ्यांच्या बाबतीत बोलले जाते. जिल्ह्यातील सुमारे चाळीसहून अधिक छंदवेड्यांनी आपल्या वर्षानुवर्षांच्या तिकीट संग्रहाचा खजिना नाशिककरांपुढे रिता केला.

टपाल तिकिटांचा नाशिककरांनी अनुभवला दुर्मिळ प्रवास
नाशिक : टपाल तिकिटे म्हटली की सर्वांनाच त्यांचे आकर्षण अन् औत्सुक्य... जगाच्या पाठीवर हा टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद तसा लोकप्रियच... छंदांचा राजा अन् राजांचा छंद असे या छंद बाळगणाऱ्यांच्या बाबतीत बोलले जाते. जिल्ह्यातील सुमारे चाळीसहून अधिक छंदवेड्यांनी आपल्या वर्षानुवर्षांच्या तिकीट संग्रहाचा खजिना नाशिककरांपुढे रिता केला.
निमित्त होते, टपाल विभागाच्या वतीने आयोजित ‘नापेक्स-२०१८’ प्रदर्शनाचे. महात्मा फुले कलादालनात शनिवारी (दि.२०) प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, प्रवर डाक अधीक्षक पी. जे. काखंडकी, सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी, वरिष्ठ पोस्टमास्तर मोहन अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्टÑीय पुरुषांची महती, टपाल विभागाचा इतिहास, नैसर्गिक जैवविविधता, पुरातत्व वास्तू, गड-किल्ले यांचा इतिहास सांगणाºया विविध टपाल तिकिटांचा इतिहास नाशिककरांना अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. गोडसे म्हणाले, टपाल विभागाने काळानुरुप कात टाकली आहे. तिकिटांचा छंद बुद्धिमत्तेला चालना व कलेची जाणीव करून देतो.
गजपंथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पोस्ट पाकिटावर
म्हसरूळजवळील गजपंथ येथील श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समाधी सम्राट श्री १०८ सुधर्मसागरजी महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त टपालाच्या पाकिटावर झळकले. प्रदर्शनात या पाकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तीर्थक्षेत्रासह सुधर्मसागरजी महाराज यांची छायाचित्रे पाकिटावर आहेत. ‘नापेक्स-२०१८’ प्रदर्शनाच्या औचित्यावर दोन विशेष टपाल पाकिटे पोस्टाने प्रदर्शित करण्याचे जाहीर केले आहे.