शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अनास्थेने झाली वाताहत

By admin | Updated: March 2, 2015 00:05 IST

परिवहन महामंडळ : नव्या मंत्रिमंडळाकडून सकारात्मक धोरणाची अपेक्षा

संकेत शुक्ल ल्ल नाशिकराज्यात दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आणि मध्यमवर्गीयांची लाइफलाइन असलेल्या परिवहन महामंडळाच्या तोट्यात दिवसागणिक होत असलेली वाढ ही गरजू प्रवाशांच्या मुळावर उठू शकते. विद्यार्थी, कामगारवर्ग, अपंग, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आवश्यक असलेली ही सेवा कायम टिकावी यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न गरजेचे असले तरी महामंडळाच्या या दुर्दशेस शासनच जबाबदार असल्याचे बोलले जाते आहे. महामंडळाचा तोटा वाढण्यासाठी जी काही कारणे आहेत त्यापैकी सरासरी एव्हरेज घसरलेल्या बसेस जशा तोटा वाढण्यासाठी कारणीभूत आहेत तस्ोच विविध प्रकारचे कर आणि टोल यामुळेही महामंडळाच्या उत्पन्नाला कात्री लागली. राज्य शासन सर्वच प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर आकारत असलेल्या कराची टक्केवारी पाहिली तर राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या महामंडळाच्या बसला सर्वाधिक कर आकारणी केली जाते. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बससेवेला त्यामुळे करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या टोलमध्ये महामंडळाच्या बसेसला टोलमाफीसाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे होते, परंतु प्रारंभी त्याकडे लक्षच न दिल्याने महामंडळाच्या टोलचा भारही प्रवाशांवर पडला. त्यामुळे आता नव्या टोलमधून महामंडळाला माफी द्यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. परिवहन महामंडळ सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक करते आणि त्याद्वारे दररोज लाखो प्रवाशांना सवलतीत प्रवास करण्याची मुभा दिली जाते. त्यात अपंग, विद्यार्थी आणि तत्सम वर्गातील नागरिकांचा समावेश होतो. त्या सेवेतून महामंडळाला होणारा तोटा शासनाकडून अनुदानाच्या रूपात दिला जातो. त्या रकमेचे शेकडो कोटी रुपये येणे बाकी आहेत. या सर्व बाबींचा शासनाने फेरविचार केला आणि त्यातून महामंडळाच्या बसेसला थोडे जरी वगळले तरी महामंडळाच्या उत्पन्नाला हातभार लागू शकेल. नवे मंत्री याबाबत काही आश्वासक घोषणा करीत असले तरी त्याची अंमलबजावणी कधी होईल याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याने महामंडळ नजीकच्या काळात नफ्यात येण्याची सुतराम शक्यता नसल्याचे दिसून येते. महामंडळ नफ्यात यावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कितीही प्रयत्न केलेत तरी त्यांना शासननिर्णयाची जोड आवश्यक आहे. केवळ घोषणा आणि आश्वासने यांनी महामंडळाचा नफा वाढणार नाही तर त्याची अंमलबजावणीही यासाठी आवश्यक आहे आणि या अंमलबजावणीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनीही तितकाच आग्रह धरणे गरजेचे आहे. कारण जर महामंडळाचे खासगीकरण झाले तर हक्काच्या परिवहन सेवेला नागरिकांना मुकावे लागेल आणि महागड्या खासगी सेवेकडे वळावे लागेल.