शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

नाशिकमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 6:36 PM

दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले.

ठळक मुद्दे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले.दोघा  संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.४) मध्यरात्री अटक केली

पंचवटी : दरोड्याच्या तयारीसाठी पेठरोडवरील कालव्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर एकत्र येऊन दबा धरून बसलेल्या टोळीचा प्रयत्न पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या जागरूकतेमुळे फसला. दोघा  संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.४) मध्यरात्री अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.४) रात्री १० वाजता पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, पोलीस हवालदार विलास बस्ते, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, सचिन म्हस्दे आदी पेठरोड परिसरात गस्त घालत असताना पेठरोडवरील पाटाजवळ एका झोपडीच्या मागे फुलेनगर येथील संशियत आरोपी प्रवीण अरुण लोखंडे (३०), अश्वमेघनगरचा दीपक किसन चोथवे (३०), राहुल पवार, विकी उर्फ टेंभºया भुजबळ व त्यांचा अन्य एक साथीदार यांची टोळी दबा धरून बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले. पोलिसांनी लोखंडे व चोथवे या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहे; मात्र त्यांच्या मागावरही पथक असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाणार असल्याचे बर्डेकर यांनी सांगितले. फुलेनगर, पेठरोड परिसरातील हे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :RobberyदरोडाCrimeगुन्हाPoliceपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय