अपघातातील वाहने पोलिसांनी केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 18:19 IST2019-03-17T18:18:50+5:302019-03-17T18:19:05+5:30

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवून अपघात करून फरार झालेला कारचालक वणी भागातील असल्याचे पुढे आले असून, अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

Police seized the vehicle from the accident | अपघातातील वाहने पोलिसांनी केली जप्त

अपघातातील वाहने पोलिसांनी केली जप्त

वणी : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवून अपघात करून फरार झालेला कारचालक वणी भागातील असल्याचे पुढे आले असून, अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
दिंडोरी-नाशिक रस्त्यावर भरधाव अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात विशाल आहेर हा युवक ठार झाला होता, तर योगेश बोरसे हा गंभीर जखमी झाला होता. अपघात घडल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी सुरू केलेल्या प्राथमिक तपासात नंदकुमार बाबूराव कापसे (रा. टेकाडी) हा कारचालक असल्याचे पुढे आले. दरम्यान अपघातातील कार व दुचाकी दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.






(१७वणी कार)

Web Title: Police seized the vehicle from the accident