नाशिकरोडच्या मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:44 IST2018-12-16T16:44:50+5:302018-12-16T16:44:53+5:30
नाशिक : बिटको हॉस्पिटलजवळील भाजीमार्केटजवळील जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि़१५) दुपारी नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकून मनमाड व जेलरोडवरील दोघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्या रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

नाशिकरोडच्या मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा
नाशिक : बिटको हॉस्पिटलजवळील भाजीमार्केटजवळील जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि़१५) दुपारी नाशिकरोडपोलिसांनी छापा टाकून मनमाड व जेलरोडवरील दोघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्या रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
भाजी मार्केटजवळील मोकळ्या जागेत मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ यानुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित मोसिन हमिद पठाण (२९, रा़ कॅम्परोड, येवलारोड, मनमाड) व बाळू कारभारी खोंड (५०, रा़ दातेचाळ, राजराजेश्वरी जेलरोड) हे कल्याण मटका जुगारावर अंक आकड्यावर पैसे लावून व घेऊन जुगार खेळवित होते़
नाशिकरोड पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांच्या जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़