राजापूरमध्ये पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:13 IST2021-01-13T18:13:22+5:302021-01-13T18:13:57+5:30
राजापूर : येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात तालुका पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले.

राजापूरमध्ये पोलिसांचे पथसंचलन
राजापूर येथे निवडणूक काळात गडबड, गोंधळ व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पथसंचलन करुन नागरिकांना सूचित करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.