बालकांच्या आॅनलाईन शिक्षणाला पोलीस अधिकाऱ्यांचा आधार .. !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 04:46 PM2020-08-23T16:46:13+5:302020-08-23T16:46:49+5:30

पेठ : कोरोना साथरोगामूळे जून पासून शाळा बंद असून शहरी भागात सुरू झालेल्या आॅनलाईन शिक्षणाचा वाडी वस्तीवरील आदिवासी बालकांनाही वापर करता यावा यासाठी पोलीसातील अधिकाऱ्यांनी पेठ तालुक्यातील चिमूकल्यांसाठी एलसीडी संच भेट दिल्याने एका गावच्या मुलांच्या शिक्षणातील अडसर दूर झाला आहे.

Police officers support online education of children ..! | बालकांच्या आॅनलाईन शिक्षणाला पोलीस अधिकाऱ्यांचा आधार .. !

पेठ तालुक्यातील मुलांसाठी एलसीडी प्रदान प्रसंगी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, डॉ. संदिप आहेर, संदिप भोसले,नम्रता जगताप,सरोज जगताप,मोतीराम सहारे आदी.

Next
ठळक मुद्देपेठ तालुक्यातील चिमूकल्यासाठी ही मदत केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : कोरोना साथरोगामूळे जून पासून शाळा बंद असून शहरी भागात सुरू झालेल्या आॅनलाईन शिक्षणाचा वाडी वस्तीवरील आदिवासी बालकांनाही वापर करता यावा यासाठी पोलीसातील अधिकाऱ्यांनी पेठ तालुक्यातील चिमूकल्यांसाठी एलसीडी संच भेट दिल्याने एका गावच्या मुलांच्या शिक्षणातील अडसर दूर झाला आहे.
ग्रामीण विशेषत: दुर्गम भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सद्या सुरू असलेल्या आॅनलाईन शिक्षणासाठी अडचणी निर्माण होत असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने डोनेट अ डिव्हाईस मोहीम सुरू केली. पेठच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या माध्यमातून निफाडचे उपविभागीय पोलीस अधिक्षक माधव रेड्डी यांनी आवाहनाला प्रतिसाद देत पेठ तालुक्यातील चिमूकल्यासाठी ही मदत केली.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे हस्ते संच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर, तहसीलदार संदिप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, केंद्र प्रमूख मोतीराम सहारे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Police officers support online education of children ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.