शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा कानाडोळा : त्रस्त नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By admin | Updated: March 22, 2015 23:39 IST

पंचवटीत कुंटणखान्याबरोबरच अमलीपदार्थांचा व्यवसाय

नाशिक : सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन स्थानिक पोलीस आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून पंचवटीतील एका रहिवासी क्षेत्रात कुंटणखाना व अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे़ विशेष म्हणजे याची तक्रार करणाऱ्यास या गुंडांकडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली जाते आहे़ पोलिसांचा वरदहस्त व गुंडांमध्ये भरडल्या गेलेल्या स्थानिक रहिवाशांनी जिवाची भीती बाजूला सारत अखेर मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांना निनावी पत्र पाठवून आपली कैफियत मांडली आहे़विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, दरोडा, जबरी लूट, विनयभंग, खंडणी अशा स्वरूपाचे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन पंचवटीतील रासबिहारी शाळेमागील मुंबई-आग्रावरील एका फार्ममध्ये सुमारे पंधरा-वीस बांगलादेशी व स्थानिक अल्पवयीन मुली आणून देहविक्री व अमली पदार्थ व्यापार सुरू केल्याचे या पत्रात म्हटले आहे़ या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही़या सराईत गुन्हेगारांशी स्थानिक पोलीस व अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध मजबूत असल्याने कारवाई केली जात नाही याउलट नागरिकांनाच धमकावून गप्प केले जाते़ या अनैतिक धंद्याच्या जीवघेण्या स्पर्धेतून खुनाचे प्रकारही घडल्याचे या पत्रात म्हटले आहे़ या अवैध धंद्यांमुळे परिसरातील महिला, मुली, तरुणी व नागरिकांचे घराबाहेर फिरणे धोकेदायक बनले आहे़ अमली पदार्थाच्या नशेतील माणसं तरुणींचा विनयभंग करतात याची तक्रार करण्यास गेल्यास हे गुन्हेगार नागरिक व महिलांना बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत असल्याचे पत्रात नमूद आहे.या परिसरातील कुंटणखाना व अमलीपदार्थांचा व्यापार बंद करण्याची मागणी येथील त्रस्त रहिवाशांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निनावी पत्राद्वारे केली आहे़ (प्रतिनिधी)