पोलीसांना पडला हेल्मेट सक्तीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 10:56 PM2019-05-11T22:56:34+5:302019-05-11T22:58:24+5:30

जोरण : ग्रामीण भागातील पोलिसांना हेल्मेट सक्ती लागू करण्याचा विसर पडला गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी नाशिक सिटी व तसेच नाशिक ग्रामीण मध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामीण भागातील जनतेला ही मोहीम विशेष वाटत होती. ही मोहीम नाशिक शहर व तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी खेड्यापाड्यातून येणार्या दुचाकी चालकांना हेलमेट वापरण्या सांगण्यात आले होते मात्र तात्पुरती ही मोहीम राबवण्यात आली होती.

Police forgot helmets forced to fall | पोलीसांना पडला हेल्मेट सक्तीचा विसर

पोलीसांना पडला हेल्मेट सक्तीचा विसर

googlenewsNext
ठळक मुद्देजोरण : ग्रामिण भागातील काही काळ हेल्मेट सक्ती राबविली

जोरण : ग्रामीण भागातील पोलिसांना हेल्मेट सक्ती लागू करण्याचा विसर पडला गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी नाशिक सिटी व तसेच नाशिक ग्रामीण मध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामीण भागातील जनतेला ही मोहीम विशेष वाटत होती. ही मोहीम नाशिक शहर व तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी खेड्यापाड्यातून येणार्या दुचाकी चालकांना हेलमेट वापरण्या सांगण्यात आले होते मात्र तात्पुरती ही मोहीम राबवण्यात आली होती.
आता पोलिसांचाच या मोहिमेकडे कानाडोळा झाला आहे.ा मध्यंतरी काही काळात ही मोहीम राबविण्यास पोलीस यंत्रनेला विसर पडला आहे तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांना हेल्मेट सक्तीचा विसर पडलेला दिसून येतो लहान-मोठ्या अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना आपला स्वत:चा जीव गमवावा लागला व तसेच वाहन चालक हे हेल्मेट वापरण्यास विसरत आहेत याकडे पोलीस अधिकारी यांचे याकडे लक्ष राहीले असते तर बहूतांश लोकांना हेल्मेटची सवई पडली असती याकडे मात्र पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष दिसून येत आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही मोहीम परत राबविली तर दुचाकीस्वारांवर आळा बसेल व तसेच प्रचंड प्रमाणात होणारे अपघात यात हेल्मेट वापरल्यामुळे दुचाकीस्वार याला आपला स्वत:चा संरक्षण निर्माण होईल याकडे नाशिक ग्रामिण पोलीसांनी ही मोहीम राबविली पाहीजे व आपघात घडल्यामुळे काही कुटूंब देखिल उद्वस्थ झाले आहेत हेल्मेट सक्ती हि ग्रामिण भागातील व शहरी भागातील वाहन चालक यांना निच्चित फायदेशिर ठरेल व तसेच संबंधिक आधिकारी वर्गाने लक्ष देवून पुन्हा हेल्मेट सिक्त लागु करावी ग्रामिण भागातील काही वाहन चालकांनी मागणी केली आहे.
प्रतिक्रि या

ग्रामिण भागातील मोटरसायकल चालकांना आव्हाण करण्यात येते की,सटाणा शहर व परिसरात हेल्मेट सक्ती लागु करण्यात आली असुन यापुढे विना हेल्मेट दुचाकी चालवितांना आढळ्यास वाहन चालकावर कठोर कार्यवाही करण्यात येणार व तसेच दुचाकी जमा करण्यात येणार याची घ्यावी व तसेच प्रत्येक वाहन चालकांनी दुचाकी वरु न प्रवास करत असतांना नेहमी हेल्मेट वापरावे
वासुदेव देसले
पोलीस निरीक्षक सटाणा पोलीस स्टेशन
नेहमी हेल्मेट वापरल्यामुळे आपण दुचाकी चालवतांना काही लहान मोठे अपघात होत रहतात हेल्मेट वापरल्यामुळे स्वताचे संरक्षण होते मात्र प्रत्येक दुचाकी चालकांनी नेहमी हेल्मेट वापरावे व स्वताची काळजी आपणच घेतली पाहीजे
नंदिकशोर सावकार
दुचाकी चालक जोरण.

Web Title: Police forgot helmets forced to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.