शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

पोलीस कुटुंबे रंगली हास्य काव्यसंमेलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:27 AM

अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या ‘काव्य कोजागरी’ या हास्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कवींनी बालक तसेच वयोवृद्धांवर अनेक मराठी व हिंदी कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

सिडको : अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या ‘काव्य कोजागरी’ या हास्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कवींनी बालक तसेच वयोवृद्धांवर अनेक मराठी व हिंदी कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.  पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे व त्यांच्या टीमने पोलीस कुटुंबीयांसाठी काव्य कोजागरी हास्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवींच्या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  यावेळी विविध कवितांनी अंबड पोलीस ठाण्याचे वातावरण उल्हासित झाले होते. कवींनी सादर केलेल्या कवितांना तितक्याच प्रमाणात उपस्थितांकडून दादही मिळत होती.  याप्रसंगी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस उपायुक्त माधुरी कांगने, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड, दिनेश बर्डेकर, राजेंद्र कुटे, करंजे, तुषार चव्हाण आदींसह पोलीस कर्मचाºयांची कुटुंबे उपस्थित होती.  याप्रसंगी कवींनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. त्यात बैलागत राबणारा बाप गाईगत होता । हात त्याचा खरबुडा आईगत होता ।।सारं फुकाच वाटून, बाप माझा झाला तुका । शिळं कुडकं खाऊन आम्ही जगविल्या भुका।। त्याचप्रमाणे ‘मॅडम तुम्ही फार छान दिसता, जितक्या छान दिसता, त्यापेक्षाही छान तुम्ही हसता ।। ’ ‘तूच माझी शान आणि तूच आमचा मान रे । तूच अस्मिता आणि तूच आमचा प्राण रे ।।’ याशिवाय ‘चिमणीच्या जोडीला घरापुढे कावळा होता । कधी काळी माणसाला पाखरांचा लळा होता ।।’ आणि ‘जिथं फाटते तिथंच ओवावा धागा । गं बाई दु:खाच्या कष्टाने लिपाव्या भेगा ।।’ अशा अनेक कवितांना दाद मिळाली.

टॅग्स :Policeपोलिसcultureसांस्कृतिक