शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

४८ तास उलटूनही पोलिसांना अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:51 AM

शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून, मंगळवारच्या रात्री इंदिरानगर, कॉलेजरोड या दोन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात खुनाच्या घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे; मात्र या घटनांमधील एकही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ठळक मुद्देधागेदोरे हाती : दोन्ही खुनातील संशयित मोकाट; तपासाला गती देण्याची मागणी

नाशिक : शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून, मंगळवारच्या रात्री इंदिरानगर, कॉलेजरोड या दोन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात खुनाच्या घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे; मात्र या घटनांमधील एकही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.इंदिरानगर परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भरवस्तीत राहत्या इमारतीजवळ जबरी लूट करत संशयितांनी व्यावसायिक अविनाश महादेव शिंदे (३४) यांना धारधार शस्त्राने भोसकून ठार मारल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने इंदिरानगरसह शहर व परिसरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांमध्ये घबराहट पसरली. संशयितांनी शिंदे यांना भोसकल्यानंतरही तेथून पळ काढला नाही, तर त्यांनी घट्ट धरून ठेवलेली सहा लाख रुपयांची बॅग हिसकावूनच पोबारा केला. या जबरी लुटीच्या घटनेत व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर सहा लाख रुपयांची रोकड लुटून नेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने ‘खाकी’चा कितपत धाक राहिला? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एका तरुण व्यावसायिकाची अशाप्रकारे जबरी लूट करून हत्या होत असेल तर ज्येष्ठ नागरिक, महिला सुरक्षित राहणार का? अशी शंकाही परिसरात घेतली जात आहे. इंदिरानगर ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळखली जाते. या खुनाच्या घटनेने ज्येष्ठ नागरिकांसह संपूर्ण इंदिरानगर परिसर हादरून गेला आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना जरी झाली असली तरी अद्याप त्यांना फारसे यश गुरुवारी (दि.१०) रात्री उशिरापर्यंत आलेले नव्हते.कॉलेजरोड खुनातील संशयित फरारपंचवटीमधील तपोवन परिसरातील पायल परदेशीसोबत काही महिन्यांपूर्वी विवाह करून जयेश दामोधर राहत होता. पायलचा त्याच्याकडून छळ सुरू झाल्याने दोघांमध्ये वैमनस्य वाढीस लागले. संशयित जयेश याने तिला सोबत घेऊन जात कॉलेजरोडवरील सत्यमलीला या व्यावसायिक सोसायटीच्या टेरेसवर नेऊन रात्रीच्या सुमारास गळा आवळून ठार मारल्याचे बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी पायलची आई सरला परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जयेशविरुद्ध गुन्हा दाखल आहे; मात्र अद्याप त्याचा कुठलाही थांगपत्ता गंगापूर किंवा पंचवटी पोलिसांना लागू शकलेला नाही. पायल ही एका साडीच्या दुकानात नोकरी करत होती, तर जयेश हा एका खासगी कंपनीकडे केबल टाकण्याचे काम करत होता.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी