संशयिताच्या बचावासाठी पोलीसच सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:26 IST2018-07-10T01:26:31+5:302018-07-10T01:26:45+5:30
पीडित मुली आणि त्यांच्या वडिलांना कोर्टकचेरी व बदनामीची भीती दाखवून एका विकृत तरु णाच्या बचावासाठी दस्तूरखुद्द पोलीस यंत्रणाच सरसावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.९) तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात उघडकीस आला.

संशयिताच्या बचावासाठी पोलीसच सरसावले
सटाणा : पीडित मुली आणि त्यांच्या वडिलांना कोर्टकचेरी व बदनामीची भीती दाखवून एका विकृत तरु णाच्या बचावासाठी दस्तूरखुद्द पोलीस यंत्रणाच सरसावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.९) तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात उघडकीस आला. बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील हे कुटुंब आहे. गेल्या शुक्र वारी दुपारच्या सुमारास हे कुटुंबीय पेरणीसाठी शेतात गेल्याच्या फायदा घेऊन एका विकृत तरु णाने घरात तीन मुली एकट्या असल्याचे पाहून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलींनी आरडाओरडा करून आपली सुटका करून घेतली. सायंकाळी आई-वडील शेतातून परत आल्यानंतर घडलेला प्रकार मुलींनी कथन केला. घडलेल्या प्रकार थेट गावच्या पोलीसपाटलांच्या कानावर घातला. पोलीसपाटलांनीदेखील या गंभीर प्रकाराबाबत जायखेडा पोलिसांत तक्र ार करण्याचा सल्ला दिला. यामुळे पीडित मुलींसह माता-पित्याने जायखेडा पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी तक्र ार घेणे तर दूरच त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात बसविण्याचा प्रयत्न केला. भलतेच प्रश्न विचारून कशाला कोर्टकचेरी मागे लागता. तुमच्या मुलींची बदनामी होईल, असा सल्ला जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व बीटच्या पोलीस कर्मचाºयांनी दिला. पोलिसांची ही भूमिका पाहून माता-पिता आवाक् झाले. पोलीस यंत्रणाच बदनामी आणि कोर्टकचेरीची भीती घालून गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
भ्रष्ट पोलीस यंत्रणेबाबत आजपर्यंत सिनेमातच बघितले होते. मात्र आज मी तो स्वत: अनुभव घेतला आहे. चिरीमिरीसाठी पोलीस कोणत्याही थराला पोहोचू शकतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जायखेडा पोलीस. आज माझ्यावर प्रसंग आला. उद्या त्या पोलिसांवर आला तर असाच सल्ला देणार का? चिरीमिरीमुळे गुन्हेगाराला पाठीशी घालणे म्हणजे गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचा प्रकार असून, अशा भ्रष्ट यंत्रणेमुळेच बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. अशा भ्रष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्र र करणार आहे. - पीडित मुलींचे पिता
घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या प्रकरणातील गुन्हेगाराला पाठीशी घालणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची मी स्वत: चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. यापुढे कोणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत असेल किंवा भीती घालत असेल त्यांच्याबाबत तत्काळ लेखी तक्र ार करावी.
- शशिकांत शिंदे, पोलीस उपअधीक्षक, मालेगाव ग्रामीण