शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

भद्रकालीतील सराईत गुन्हेगार ‘दहशत’ यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 6:42 PM

नाशिक : भद्रकाली परिसरात कोयता घेऊन दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार फरहान उर्फ दहशत यास भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़२४) दुपारी बेड्या ठोकल्या़ याबरोबरच एका कारची तपासणी करून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्या कारमध्ये धारदार शस्त्रे आढळून आली आहे़

ठळक मुद्देदादागिरी व हफ्तेवसुली धिंड काढून दहशत मोडली

नाशिक : भद्रकाली परिसरात कोयता घेऊन दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार फरहान उर्फ दहशत यास भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़२४) दुपारी बेड्या ठोकल्या़ याबरोबरच एका कारची तपासणी करून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्या कारमध्ये धारदार शस्त्रे आढळून आली आहे़

चौकमंडईतील रॉबीन बिस्कीट परिसरात संशयित तरूण कोयता घेवून दहशत पसरवित असल्याची माहिती भद्रकालीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांना मिळाली होती़ त्यानुसार सूर्यवंशी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह चौक मंडईत धाव घेऊन संशयित फरहान उर्फ दहशत कलीम शेख (२० रा.रॉबीन बिस्कीट मागे,चौकमंडई) यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडे एक धारदार कोयता आढळून आला़ फरहान हा नेहमी परिसरात दादागिरी व हफ्तेवसुली करीत असल्याने त्यास ‘दहशत’ ही उपाधी देखील मिळालेली आहे.

सराईत फरहान शेखविरोधात भद्रकाली व अंबड पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून निरीक्षक सूर्यवंशी यांनी परिरातून त्याची धिंड काढून त्याची दहशत मोडून काढली़ या प्रकरणी पोलिस शिपाई एजाज पठाण यांच्या फिर्यादीवरून शस्त्रबंदी आदेश उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुसरी घटना पंचवटीतील सेवाकुंज परिसरात घडली़ या ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये धारदार शस्त्रे असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सोमवारी (दि़२५) दुपारी पोलिसांनी कारची (एमएच १५ एएस १८७७) झडती घेतली असता चालकाच्या सीटखाली धारदार लोखंडी कोयता मिळून आला. याप्रकरणी वैभव ज्ञानेश्वर तुपे, देवा राजेंद्र कुराडे व सुरज नंदराज चौधरी (रा.तिघे दिंडोरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गाळ्यांच्या शटरची चोरीनाशिक : पंचवटीतील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील चार ते पाच गाळ्यांचे शटर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत घडली आहे़ बिल्डिंग नंबर चारमधील गाळा नंबर ८ व इतर चार ते पाच गाळ्यांचे शटर चोरून नेण्यात आले आहेत़ या प्रकरणी पोलीस शिपाई जाधव यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुचाकीची चोरीनाशिक : पंचवटीतील गुरू गोविंदसिंग हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी एकबालसिंग गुरूनामसिंग बाबरा यांची ५० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड दुचाकी (एमएच १५ जीएम ९६४६) चोरट्यांनी २ सप्टेंबरच्या मध्यरात्री आडगाव शिवारातील समर्थनगरमधील तुंगभद्रा अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक