शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पाथर्डीफाटा येथे एटीएम फोडण्याचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 1:17 AM

पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल जोडीच्या सतर्क रात्रगस्तीमुळे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी वेळीच पाठलाग करून चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देसतर्क ता : चार अल्पवयीन मुले ताब्यात

इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल जोडीच्या सतर्क रात्रगस्तीमुळे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी वेळीच पाठलाग करून चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल दिनेश पाटील व किसन गिधाडे हे रात्रीच्या गस्तीवर होते. पाथर्डी फाटा येथील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएमजवळ असलेले क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास गेले असता त्यावेळी एटीएममधून दोन संशयित इसम त्यांना पाहून पळाले. यामुळे बीट मार्शल यांनी एटीएममध्ये जाऊन बघितले असता एटीएम यंत्राची तोडफोड झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माइनकर व पोलीस कंट्रोल रुमला माहिती कळवून अधिक मदत मागितली. संबंधित संशयित आरोपींचा बीट मार्शलने पाठलाग सुरू केला. तोपर्यंत इंदिरानगर गुन्हे शोध पथकसुद्धा संशयित आरोपींच्या मागावर लागले होते. त्यावेळी वासननगर येथील एका गार्डनलगत उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या आडोशाला एक संशयित लपल्याचे लक्षात येताच त्यास ताब्यात घेतले.त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, अखलाक शेख, संदीप लांडे, जावेद खान आदींनी परिसरात शोध घेत त्या संशयित आरोपीचे साथीदार आरोपी रूपेश शिवाजी कहार (२१, अंबड) यास खाकीचा हिसका दाखवून विचारपूस केली असता त्याने उर्वरित चार संशयित आरोपींची नावे सांगितले. अवघ्या दीड तासात त्या संशयित चार मुलांना ताब्यात घेतले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी