शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीमुळे बेरोजगारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:33 IST

उद्योजकांवर संकट : तीन हजार कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न

नाशिक : राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर हजारो कुटुंबांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिकमध्ये सुमारे दोनशे उद्योग प्लॅस्टिकचा पुनर्वापर करीत प्लॅस्टिक पिशव्या तयार करतात; परंतु प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे या क्षेत्रातील कामगारांसह प्लॅस्टिक कचरा संकलित करून या उद्योगांना पुरविणाऱ्या हजारो कुटुंबीयांवरही बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.नाशिक औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसह जिल्हाभरातील विविध भागातून प्लॅस्टिक कचºयाचे संकलन करून त्यावर सुमारे तीन ते चार हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर अवलंबून होता. नाशिकमध्ये जवळपास ५०० प्लॅस्टिक उत्पादक उद्योग आहेत. त्यापैकी २०० उद्योग प्लॅस्टिक चा पुनर्वापर करून पिशव्या तयार करतात. प्लॅस्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघु उद्योग विभागात मोडणारा व्यवसाय असला तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन होत होते. तर नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक व बाहेरील उद्योजकांकडून येणाºया प्लॅस्टिक पिशव्यांसह जवळपास एक हजार कोटींची उलाढाल होत होती. त्यामुळे प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करणाºया उद्योगांना शहर व परिसरातील प्लॅस्टिक कचरा संकलित करून विकणाºया हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह होत होता. परंतु, आता प्लॅस्टिक पिशव्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावरच बंदी आल्याने या क्षेत्रात काम करणाºया सुमारे तीन ते चार हजार कुटुंबांसमोर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे.प्रभावी कचरा व्यवस्थापनाचा उपायएकल पॉलिमरद्वारे बनविलेल्या प्लॅस्टिक पिशव्या टिकाऊ, पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि किफायतशीर असतात. प्लॅस्टिक पिशव्या, किराणा मालासाठीच्या बॅग, किरकोळ बॅग, कचरा बॅग, झिपलॉक बॅग वगैरे प्रकारच्या पिशव्या न वापरणे फारच गैरसोयीचे ठरणार आहे. यासाठी सर्व नागरी स्थानिक संस्थांनी आपापल्या भागांतील कचºयाची पूर्ण विल्हेवाट लावणे व प्रभावी कचरा व्यवस्थापन करणे हाच यावर एकमेव उपाय असल्याची प्रतिक्रिया प्लॅस्टिक बॅग उत्पादकांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी