शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावच्या डॉक्टर दाम्पत्यास सक्तमजुरी

By admin | Updated: September 4, 2016 01:39 IST

गर्भलिंगनिदान : जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा

नाशिक : गर्भलिंगनिदानास कायद्याने बंदी असताना गर्भलिंगनिदान करणारे पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरुण दौलत पाटील आणि डॉ. शोभना अरुण पाटील या दाम्पत्यास पिंपळगाव (ब.) येथील न्यायाधीश एम. आर. सातव यांनी शनिवारी (दि़३) गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्र (गर्भलिंग निवड प्रतिबंधक) कायदा १९९४ सुधारित २००३ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ़ अरुण व शोभना पाटील यांच्या क्लिनिकमध्ये गर्भलिंगनिदान केले जात असल्याची तक्रार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६६६.ेंूँ्रे४’ॅ्र.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर २०१२ मध्ये प्राप्त झाली होती़ या तक्रारीनुसार शासनाच्या एका समितीने या ठिकाणी छापा टाकून कागदपत्रांची पाहणी केली होती़ समुचित अधिकारी डॉ़ प्रल्हाद गुठे यांनी क्लिनिकमधील आढळलेल्या त्रुटींच्या आधारे त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता़पीसीपीएनडीटी कायद्यान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्याचा खटला पिंपळगाव बसवंत येथील न्यायाधीश एम़ आऱ सातव यांच्या न्यायालयात सुरू होता़ विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ स्वाती कबनुरकर यांनी या खटल्यात सक्षमपणे सरकारची बाजू मांडून पुरावे सादर केले़ या पुराव्यानुसार डॉ़ अरुण व शोभना पाटील यांना दोषी ठरविण्यात येऊन तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली़ दरम्यान, पाटील दाम्पत्यावर दोषारोप पत्र ठेवल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने दोन्ही वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी खटल्याच्या अंतिम निकालापर्यंत निलंबित केली होती.-