पिंपळगाव बसवंतला दाेघांना बसने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:30 AM2021-01-30T01:30:09+5:302021-01-30T01:31:54+5:30

बेदरकारपणे बस चालविणाऱ्या बस चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन युवकांना चिरडल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे घडली आहे. त्यातील शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी झाला आहे. सोमनाथ गायकवाड थोडक्यात बचावला.

Pimpalgaon Baswant was crushed by the bus | पिंपळगाव बसवंतला दाेघांना बसने चिरडले

पिंपळगाव बसवंतला दाेघांना बसने चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्देएकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

पिंपळगाव बसवंत : बेदरकारपणे बस चालविणाऱ्या बस चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन युवकांना चिरडल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे घडली आहे. त्यातील शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी झाला आहे. सोमनाथ गायकवाड थोडक्यात बचावला.
सदर घटना रिलायन्स पेट्रोल पंप मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी (दि. २९) सकाळी ६.३० वाजता घडली. घटनेनंतर बसचालक फरार झाला असून, चालकाविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव शहरातील वैभव, राकेश, सोमनाथ हे नित्यक्रमाने शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकवर निघाले असता, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या बसने भरधाव येत तिघांना जोराची ठोकर मारली. 
जखमी अवस्थेत असणाऱ्या दोघांना दवाखान्यात न नेता, बस चालक बस घेऊन फरार झाला. या अपघातात परिसरातील शिवाजीनगर, कोळीवाडा येथे राहणाऱ्या वैभव दायमा या युवकाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर राकेश वाघाले गंभीर जखमी असून, सोमनाथ गायकवाड हा थोडक्यात बचावला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ व योगेश बुरगुले करत आहेत.
अनेकांचा जीव वाचला...  
अज्ञात बस चालक अपघात करून फरार होत असताना, अत्यंत भरधाव वेगाने बस नेत असल्याने मॉर्निंग वॉक  व मोटारसायकलवर जाणाऱ्या इतर अनेकांचा जीव टांगणीला होता. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता, पोलिसांनीं या बस चालकाचा शोध घेत चालकावर कारवाई करावी, अशी  मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Pimpalgaon Baswant was crushed by the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.