शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

‘फाळके स्मारक’ पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:22 AM

फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यास पालिकेने तत्वत: मान्यता दिली असल्यामुळे नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाचा चेहरामोहरा बदलू शकतो, अशी अपेक्षा नाशिककरांना आहे.

इंदिरानगर : फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यास पालिकेने तत्वत: मान्यता दिली असल्यामुळे नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाचा चेहरामोहरा बदलू शकतो, अशी अपेक्षा नाशिककरांना आहे. मात्र येथील कामकाज प्रत्यक्षात कधी सुरू होते, याची प्रतीक्षा करावी लागत आहे.फाळके स्मारक परिसरात दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांनी स्मारकाकडे पाठ फिरवल्याने महापालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. पंधरा वर्षांपूर्वी पांडवलेण्याच्या पायथ्याशी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून दादासाहेब फाळके स्मारक उभारले. या ठिकाणी लॉन्स, खेळणी, एमपी थिएटर, कलादालन ,म्युझिक कारंजा व चित्रप्रदर्शन आदींची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे नाशिकच्या सौंदर्यात भरच पडली होती. मुंबई महामार्गावरून नाशिकला प्रवेश करताना फाळके स्मारक पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले होते.शहराला महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असल्याने स्मारकात नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असे. महापालिकेला प्रवेश शुल्कातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. दहा वर्षांपूर्वी दररोज तीस ते चाळीस हजार रुपयांचा महसूल गोळा केला जातो होता; परंतु आता केवळ तीन ते चार हजार रु पये दररोज महसूल जमा होत आहे. यातून साधे स्मारकाचे वीज बिलसुद्धा भरले जात नसल्याचे समजते. देखभाल व कर्मचाऱ्यांचा पगार कसा सुटेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या सहा ते सात वर्षांपासून स्मारकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामध्ये खेळणी तुटलेल्या काही भागात लॉन्स सुकलेले, तसेच संगीत कारंजा बंदावस्थेत आहे. याठिकाणी असलेल्या खुर्च्या आहेत की नाही असा प्रश्न पर्यटकांना पडतो. कलादालनाचा दरवाजा निखळून पडला आहे. देखभालीअभावी आणि सुविधांअभावी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसुलावरही मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे.अपेक्षित महसूल नाहीमहापालिकेने यंदा महासभेत फाळके स्मारकाच्या सुधारणेचा आणि फिल्मसिटीचा निर्णय घेतला आहे. परंतु आचारसंहितेमुळे याबाबतची पुढची कार्यवाही होऊ शकलेली नाही. जोपर्यंत येथे महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही, बालगोपाळांची संख्या वाढत नाही तोपर्यंत अपेक्षित महसूलदेखील मिळू शकणार नाही. खरेतर या स्मारकात प्रेमीयुगुलांना प्रवेश देता कामा नये. बाह्य हस्तक्षेप, तरुण-तरुणींचा अड्डा यामुळे या ठिकाणी कुटुंबीय फिरकत नाही.प्रेमीयुगुलांचा वावर जास्तपूर्वीप्रमाणे येथे पर्यटक तसेच नाशिककर फिरकत नाही. स्मारकाचा ताबा आता प्रेमीयुगुलांनी घेतल्याने त्यांच्या उपद्रवामुळे तर येथे येणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. जे काही बोटावर मोजण्याइतके पर्यटक येतात तेही तरुण-तरुणींच्या अश्लील चाळ्यांमुळे पुन्हा स्मारकाकडे फिरकत नाहीत. प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांमुळे त्यांची संख्या घटली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक