शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

कळवण बाजार समिती उभारणार पेट्रोलपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 4:28 PM

वार्षिक सभा संपन्न : वर्षभरात पावणेदोन कोटींची कामे पूर्ण

ठळक मुद्दे१ कोटी ६९ लाख ३२ हजार रु पये खर्च वजा जाता समितीस १ कोटी २८ लाख ७३ हजार रु पये निव्वळ नफा

कळवण : शेतकरी हिताबरोबरच व्यापारी व कामगार यांना केंद्रबिंदू मानून बाजार समितीने मागील वर्षात १ कोटी ८० लाख रुपये खर्चून विकास कामे पूर्ण केली असून आगामी काळात नाकोडा येथील उपबाजारात काँक्रिटीकरणासह संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व पावसाळी पत्राशेड उभारण्यात येणार आहे. याशिवाय शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी कळवण व अभोणा येथे बाजार समितीचे स्वत:चे पेट्रोलपंप सुरु करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समितीच्या मुख्य सभागृहात घेण्यात आली. सभेत बोलताना सभापती धनंजय पवार यांनी सांगितले, बाजार समितीला सर्व बाबींपासून २ कोटी ९८ लाख रु पये उत्पन्न मिळाले असून १ कोटी ६९ लाख ३२ हजार रु पये खर्च वजा जाता समितीस १ कोटी २८ लाख ७३ हजार रु पये निव्वळ नफा झाला आहे. आर्थिक वर्षात कळवण आवारात ५० टनी नवीन भुईकाटा , अभोणा उपबाजार आवारात जागतिक बँक व बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एमएसीपी प्रकल्पाअंतर्गत आवारात खडीकरण, डांबरीकरण, लिलावासाठी शेड उभारणी करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, टॉयलेट ब्लॉकस उभारणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. अहवाल वाचन सचिव रवींद्र हिरे यांनी केले. उपभापती साहेबराव पाटील यांनी आभार मानले. शंकरराव निकम, प्रभाकर निकम, घनश्याम पवार, विनोद खैरनार,दशरथ बच्छाव, माणकि देवरे, रवी सोनवणे, विठोबा बोरसे, कैलास जाधव , नितीन पवार, संभाजी पवार, मधुकर वाघ, नरेंद्र वाघ, चंद्रकांत पवार, प्रभाकर खैरनार यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी यावेळी कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे उपसभापती साहेबराव पाटील, यावेळी कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे उपसभापती साहेबराव पाटील, आदिवासी नेते पोपट वाघ, नारायण पवार, केदा बहिरम, मविप्रचे संचालक अशोक पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, अ‍ॅड.संजय पवार, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ, मजूर संस्थेचे संचालक हरिभाऊ वाघ, मधुकर जाधव, रमेश पवार आदी उपस्थित होते.कनाशी उपबाजारासाठी जमीनकनाशी उपबाजारासाठी जमीन खरेदी करण्यात आली असून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा पुरविण्याचा मानस संचालक मंडळाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कळवण तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या नविनर्वाचित संचालक, ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थेवर निवड झालेल्या सभासद यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकMarket Yardमार्केट यार्ड