शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

पेठ तालुकास्तरीय जि.प. अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:14 AM

जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अध्यक्ष व सभापती चषक कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्या. तालुकास्तरावर प्रथम येणाºया स्पर्धकांना जिल्हास्तरीय सहभागाची संधी मिळणार आहे.

पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अध्यक्ष व सभापती चषक कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्या. तालुकास्तरावर प्रथम येणाºया स्पर्धकांना जिल्हास्तरीय सहभागाची संधी मिळणार आहे. आश्रमशाळा पेठ येथील प्रांगणात झालेल्या दोन दिवसीय स्पर्धांचे उद्घाटन सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते करण्यात आले, तर जि.प. सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष लता सातपुते, उपसभापती तुळशीराम वाघमारे, सदस्य पुष्पा पवार, नंदराम गवळी, विठ्ठल गवळी उपस्थित होते.  केंद्रप्रमुख एम.एच. सहारे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख, मुख्या-ध्यापक, प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, परीक्षक, शिक्षक, विषयतज्ज्ञ, विद्यार्थी खेळाडू मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.  गटशिक्षणाधिकारी वसंत खैरनार यांनी आपल्या प्रास्ताविकात आदिवासी मुलांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांची गरज असल्याचे सांगतानाच याच स्पर्धांच्या माध्यमातून नाचलोंढी शाळेची वर्षा चौधरी राष्ट्रीय पातळीवर झेप घेऊ शकल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :SchoolशाळाSportsक्रीडा