‘मनरेगा’च्या कामात पेठ तालुका सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:44 IST2020-06-01T21:37:52+5:302020-06-02T00:44:44+5:30
पेठ : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड पडली. मात्र, काही अटी-शर्थींवर शासकीय स्तरावरून अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने अनेकांची चूल पेटू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेतून काम मिळवून देण्यात पेठ तालुका नाशिक जिल्ह्यात सरस असून, ३२५ कामांवर ४१७० मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गावस्तरावर बेरोजगारांना काम मिळावे यासाठी पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागासह इतर विभागांनी गावतळे, रस्ते, विहीर, चारी खोदणे आदी कामांना प्रारंभ करण्यात आला
आहे.
लॉकडाउननंतर काम नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मजुरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. काम करताना मजुरांकडून शारीरिक अंतर पाळले जात आहे.
------------------------
स्थलांतरित मजुरांना दिलासा
पेठ तालुक्यातील बहुतांश शेतमजूर रोजगार नसल्याने इतर ठिकाणी स्थलांतरित होत असतात. कोरोनाचे संकट आणि वाढत्या लॉकडाउनमुळे जवळपास सर्वच मजूर आपल्या मूळ गावाकडे परतले असून, अनेकांना ’मनरेगा’च्या कामांमुळे तात्पुरता आर्थिक दिलासा मिळाला आहे.
------------------------
पेठ तालुक्यात बहुतांश नागरिक रोजंदारी कामगार आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कामांना सुरु वात केली असून, अनेकांच्या घरची चूल आज पेटते आहे. पावसाळा तोंडावर आल्याने मजुरांची संख्या आणखी वाढवून कामे पूर्ण करण्याकडे शासनाचा कल आहे.
- वसंत गवळी, उपअभियंता, पाटबंधारे उपविभाग, पेठ