पेठ परिसरात भात, नागली लावणीस वेग

By Admin | Updated: August 4, 2014 00:46 IST2014-08-03T20:03:22+5:302014-08-04T00:46:08+5:30

पेठ परिसरात भात, नागली लावणीस वेग

Peth area, rice, Nagli Lavaniya | पेठ परिसरात भात, नागली लावणीस वेग

पेठ परिसरात भात, नागली लावणीस वेग

 

पेठ : तब्बल तीन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर तालुक्यात पावसाने समसधानकारक प्रारंभ केल्याने दुष्काळाच्या खाईत लोटल्या जाणाऱ्या बळिराजाला थोडापार दिलासा मिळाला असून उशिराने का होईना पए सद्वा तालुक्यात भातासह नागलीची लावणी जोरात सुरू झाली असून यामुळे मजूरांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे़
यावर्षी पावसाने सुरूवातीलाच दडी मारल्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांना दुबार रोप पेरणीचा सामना करावा लागला़ दुसरीकडे आषाढी एकादयीनंतर पाऊस सक्रिय झाला खरा पण रोपच नसल्याने आता
काय करावे अशा विवंचनेत
शेतकरी सापडला़तशाही परिस्थितीत हाताला येईल ते रोप उनटून येतकऱ्यांनी लावणीला सुरूवात केली़दरवर्षी लावणी करून विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला
जाणारा आदिवासी भागातील शेतकरी यावेळी मात्र शेतीकामातच मग्न राहिला़
सुरूवातील भाताची लागवड पूर्ण झाल्यावर मग नागलीची लागवड करण्याची पध्दत असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे यावेळी भातासह नागलीचीही लागवड उरकवण्याच्या स्थितीत शेतकरी पाहवयास मिळत आहे़ सद्या सर्वत्र भाताची खाचरे पाण्याने तुंडूंब भरली असल्याने लावणीला योग्य वातावरण असल्याचे शेतकरी सांगतात़ तर नागलीला जास्त पावसाची गरज नसल्याने डोंगरउतारावर नागलीची लागवड करतांना शेतकरी दिसून येतात़

Web Title: Peth area, rice, Nagli Lavaniya