हल्लेखोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:51 IST2019-01-13T00:50:28+5:302019-01-13T00:51:36+5:30
ठाणे येथील भाजीपाला व्यापाऱ्याची लूट करणाºया चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी नाशिक बाजार समितीत आलेल्या व्यापाºयाला मारहाण करून भ्रमणध्वनी तसेच खिशातील पाच हजारांची रोकड लांबविणाºया तिघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

हल्लेखोरांना अटक
पंचवटी : ठाणे येथील भाजीपाला व्यापाऱ्याची लूट करणाºया चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे जिल्ह्यातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी नाशिक बाजार समितीत आलेल्या व्यापाºयाला मारहाण करून भ्रमणध्वनी तसेच खिशातील पाच हजारांची रोकड लांबविणाºया तिघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ठाणे जिल्ह्यातील गोलाईनगर खारेगाव येथे राहणारे भाजीपाला व्यापारी सूर्यकुमार शिवकुमार मौर्या यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात लूटमारप्रकरणी शुक्रवारी (दि.११) तक्रार दिली होती. मौर्या हे त्यांच्या व्यावसायिक मित्रासोबत भाजीपाला खरेदीसाठी आले असता रविवार कारंजा लवंगेवाडा येथील संशयित आरोपी दीपक अनिल नामेकर, भद्रकालीतील प्रीतम प्रशांत बेलेकर व प्रथमेश प्रकाश शेलार या तिघांनी त्यांना बेदम मारहाण करून खिशातील पाच हजार रुपयांची रोकड तसेच भ्रमणध्वनी हिसकावून नेल्याची घटना घडली. घटनेनंतर त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तत्काळ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सहायक निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांनी याप्रकरणी तपास करत तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.