शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या गोंधळातच ‘स्थायी’च्या नियुक्त्या

By admin | Updated: March 31, 2017 00:45 IST

नाशिक : महापालिका स्थायी समितीवर राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया विरोधकांनी घातलेल्या गोंधळातच महापौर रंजना भानसी यांनी पार पाडली.

 नाशिक : महापालिका स्थायी समितीवर राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया विरोधकांनी घातलेल्या गोंधळातच महापौर रंजना भानसी यांनी पार पाडली. स्थायी समितीवर भाजपाचे ९, शिवसेनेचे ४ तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीही भाजपाच्या ताब्यात असणार आहे. दरम्यान, शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने विरोधकांकडून वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु महापौरांनी त्यास दाद न देता नियुक्तीप्रक्रिया पूर्ण केली. महापालिका स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महापौरांनी विभागीय आयुक्तांकडून आलेल्या गटनोंदणीच्या पत्रांनुसार गटनेत्यांची निवड जाहीर केली. त्यात शिवसेनेचे विलास शिंदे, भाजपाचे संभाजी मोरुस्कर, कॉँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार आणि मनसेचे सलीम शेख यांची गटनेतापदी निवड करण्यात आली. तत्पूर्वी, कॉँग्रेस वगळता अन्य सर्व पक्षांनी आपल्या सदस्यांच्या नियुक्तीसंबंधीचे पत्र नगरसचिवांकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे पत्र देण्यासाठी कॉँग्रेसला दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला. पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉँग्रेसचे शाहू खैरे यांनी आपली आताच गटनेतापदी निवड झाली असल्याने चर्चा करण्यासाठी अर्धा तासाची मुदत मागितली. त्यानुसार, महापौरांनी आणखी दहा मिनिटांचा अवधी देत तोपर्यंत महासभा तहकूब केली. दहा मिनिटांनंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाले असता राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी रिपाइंच्या एकमेव सदस्या दीक्षा लोंढे यांचा कोणाच्या गटात समावेश केला आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांची स्वतंत्र नोंदणी झाली असेल तर रिपाइंच्या गटनेतापदी निवड करण्याची सूचना केली. परंतु, नगरसचिव ए. पी. वाघ यांनी महसूल आयुक्तांकडून आलेल्या पत्रानुसारच गटनेत्यांची निवड केली असल्याचा खुलासा केला.