शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क प्रवेश करणाऱ्यांवरहोणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 15:51 IST

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथे येणाºया नागरीकांनी टाकेद गावामध्ये प्रवेश करतांना तोंडाला मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतने गावातील दुकानदार व ग्रामस्थ यांच्या एकमताने सुरू केली आहे.

ठळक मुद्देसर्वतीर्थटाकेद:ग्रामपंचायत, ग्रामस्थ, दुकानदार वर्गाचा एक मताने निर्धार

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथे येणाºया नागरीकांनी टाकेद गावामध्ये प्रवेश करतांना तोंडाला मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतने गावातील दुकानदार व ग्रामस्थ यांच्या एकमताने सुरू केली आहे.ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागात घोटी नंतर खरेदी विक्र ी व व्यवहारासाठी टाकेद हीच सर्वांना सोयीस्कर एकमेव प्रमुख बाजारपेठ आहे. येथे आंबेवाडी वासाळी पासून ते भरवीर अडसरे ते अकोले तालुक्यातील एकदरे, कोकणवाडी, बिताका खिरवीरे आदींसह चाळीस वाड्या व पंचवीस तीस ग्रामपंचायती आदी ठिकाणाहून दररोज शेकडो लोक दररोज ये-जा करतात.कोवीड-१९ ची सुरवातीला असलेली दहशत आता मात्र लोक पाळतांना दिसत नाही. नागरीक बिंधास्तपणे वावरत असल्याचे लक्षात येताच व गावात कोरोनाने शिरकाव केल्याने सरपंच ताराबाई बांबळे, उप-सरपंच रामचंद्र परदेशी, सदस्य सतिष बांबळे, विक्र म भांगे, नंदा शिंदे, कविता धोंगडे, लता लहामटे, रतन बांबळे, राम शिंदे यांनी ग्रामपंचायतमध्ये गावातील सर्व दुकानदार, ग्रामस्थांसमवेत सुरक्षित अंतर ठेवत मिटींग घेऊंन दुकानदार व ग्राहकाला मास्क नसल्यास दोघांनाही दंड करण्याबाबतचा ठराव एकमताने करण्यात आला.त्यानुसार पहिल्याच दिवशीं हजारों रु पये दंड वसुल करण्यातही आला. गावात ग्रामपंचायतकडून ध्वनिक्षेपकाच्याद्वारे माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझा गाव माझी जबाबदारी, मास्क वापरा कोरोना टाळा,महिन्यातून दोन वेळेस थर्मल आरोग्य तपासणी,जंतू नाशक औषध फवारणी, सॅनिटायझर, कोरोना बचाव जनजागृती आदी उपक्र म राबविण्यात येत आहे.विना मास्क आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून दोनशे रु पये दंड वसुल करण्यासाठी ग्रामपंचायतने या पेक्षाही कड़क भुमिका घेऊन विना मास्क व्यवहार करणारे पकडून देणाऱ्यांना दंड रकमेतून ठरावीक टक्केवारी बक्षीस दिल्यास यापेक्षाही कड़क अंमलबजावणी होईल असे सुचविण्यातआले. मास्क सॅनिटायझरचा काटेकोरपणे पुरेपूर वापर करा असे परिसरातील सर्व प्रवासी वाहनधारकांना ग्रामस्थ नागरिकांना ग्रामपंचायतकडून आवाहन करण्यात आले आहे.प्रतिक्रि या...टाकेद ही परिसरातील एकमेव बाजारपेठ असल्याने बुधवार हा बाजाराचा दिवस संपूर्ण गाव, गावातील दुकाने बंद असतात,माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून माझा गाव माझी जबाबदारी ही भूमिका घेऊन ग्रामीण भागात होत असलेला कोरोनाचा शिरकाव लक्ष्यात घेता विना मास्क गावांमध्ये प्रवेश करणाºयांवर सर्वानुमते दोनशे रु पये दंड ठेवण्यात येत आहे.- ताराबाई रतन बांबळे, सरपंच, टाकेद बु. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या