शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

पवननगर भाजी मार्केट समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:22 PM

पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असून, मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण, परिसरात साचलेली घाण यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी येथील व्यावसायिकांनी नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडत समस्या निकाली काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे नगरसेवक, मनपा अधिकाऱ्यांना व्यावसायिकांनी विचारला जाब

सिडको : पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असून, मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण, परिसरात साचलेली घाण यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी येथील व्यावसायिकांनी नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडत समस्या निकाली काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.सिडकोतील मुख्य भाग असलेल्या पवननगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून जिजामाता भाजी मार्केट सुरू आहे. या ठिकाणी दोनशेहून अधिक गाळे असून, ग्राहकांची दररोज गर्दी असते. येथील व्यावसायिक व परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरसेवक सुधाकर बडगुजर व महापालिका अधिकाºयांनी मार्केटची पाहणी केली. यावेळी व्यावसायिक व भाजीविक्रेत्यांनी समस्यांचा पाढा वाचला. शौचालय नसल्याने व्यावसायकिांना उघड्यावरच जावे लागते. भाजीबाजारालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावरच लावावी लागत आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक रस्ता अतिक्रमणात जात असल्याने वाहनधारकांना यातून मार्ग काढणेदेखील कठीण होत आहे. याबरोबरच भाजी मार्केटच्या आतील भागातही व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. याभागात वाढते अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रोज छोटे-मोठे अपघात घडत आहे.भाजी मार्केट परिसरात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात घाण कचरा पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समस्या सोडविण्याबाबत नगरसेवक व मनपा अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी आप्पा नारायणे, शिवसिंग देवरे, राजेंद्र जपकाळ, नामदेव शिवदे, राजेंद्र पगार, सतीश काळे, नामेदव काळे, नीलेश वाणी, मोहन घुगे आदींसह व्यावसायिकांनी केली आहे.भाजी मार्केटची पाहणीपवननगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून जिजामाता भाजी मार्केट सुरू आहे. या ठिकाणी दोनशेहून अधिक गाळे असून, ग्राहकांची दररोज गर्दी असते. येथील व्यावसायिक व परिसरातील नागरिकांना या ठिकाणी अनेक समस्या भेडसावत असून, याबाबत नगरसेवक सुधाकर बडगुजर व महापालिका अधिकाºयांनी मार्केटची पाहणी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण