शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाच्या गजरात पविते अर्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:00 IST

राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा, असेही म्हणतात. कोळी बांधवात हा सण सागराला नारळ अर्पण करून साजरा करतात. त्याचप्रमाणे महानुभाव पंथातदेखील गोविंदाच्या गजरात परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो.

नाशिक : राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा, असेही म्हणतात. कोळी बांधवात हा सण सागराला नारळ अर्पण करून साजरा करतात. त्याचप्रमाणे महानुभाव पंथातदेखील गोविंदाच्या गजरात परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो.दरम्यान, परमेश्वरबरोबर गुरूलादेखील पविते अर्पण करण्यात येते. यासाठी महानुभाव पंथीय श्रीकृष्ण व श्रीदत्त मंदिरात उत्साहाचे वातावरण असून, आकर्षक सजावट करण्यात येत आहे. नारळी पौर्णिमेच्या सणाला तसेच चतुर्दशीला महानुभाव पंथात पविते पर्व हा धार्मिक उत्सव साजरा करण्यात येतो. भगवान श्रीकृष्ण तथा पंचावतारांना सुताने गुंफलेल्या नारळाचे पविते अपर्ण करण्यात येते. जन्माष्टमीपर्यंत हा उत्सव तथा विधी सुरू असतो. यानिमित्त नारळी पौर्णिमेपासून ते जन्माष्टमीपर्यंत मंदिरात आणि आश्रमात आकर्षक सजावट करण्यात येते. तसेच उटी, उपहार, पूजा, भजन, कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रम होतात. घरोघरीही देवघराची सजावट आणि आरास करण्यात येते.नाशिक जिल्ह्यात महानुभाव पंथाची अनेक तीर्थस्थाने असून, यात कसबे सुकेणे तथा सुकदाणी बाबा आणि सिन्नर या तीर्थक्षेत्राचे महत्त्वाचे स्थान आहे. याठिकाणी चतुर्दशीला नारळी पौर्णिमेला देवाला पविते अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते तसेच नाशिक शहरात मोरवाडी येथील दत्तमंदिर, श्रीकृष्णमंदिर, गंगापूर गावातील दत्तमंदिर, आडगाव येथील श्रीकृ ष्णमंदिरातदेखील पविते पर्व विधी साजरा करण्यात येत आहे. सर्वच मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून, नारळी पौर्णिमेचा पूर्वसंध्येलाच भाविकांनी देवाला तसेच गुरुंना गोविंदाच्या गजरात पवते अर्पण केले.