इगतपुरीत कोरोनाचा रुग्ण आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:55 IST2020-05-30T23:03:38+5:302020-05-30T23:55:05+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, बेलगाव कुºहे या ठिकाणी रु ग्ण मिळाल्यानंतर शनिवारी इगतपुरीतदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.

इगतपुरी येथील खालची पेठ परिसरात कोरोना रु ग्ण आढळल्यामुळे परिसराची पाहणी करताना तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूपा देवरे आदी.
नांदूरवैद्य : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, बेलगाव कुºहे या ठिकाणी रु ग्ण मिळाल्यानंतर शनिवारी इगतपुरीतदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. परंतु आता इगतपुरी शहरात कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केला आहे. खालची पेठ येथील एक वयोवृद्ध इसम कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व ग्रामीण रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूपा देवरे यांनी लागलीच या विभागाची पाहणी करून या ठिकाणापासून ५० मीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. दरम्यान, इगतपुरी शहरात दि. ३१ मे ते ४ जूनपर्यंत जीवनावश्यक सेवावगळता संपूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.