ब्राह्मणगावी पोलिसांतर्फे पथ संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 17:17 IST2021-01-10T17:16:46+5:302021-01-10T17:17:20+5:30
ब्राह्मणगाव : ब्राह्मणगाव व लखमापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु असून ही दोन्ही गावे निवडणुकीसाठी अती संवेदनशील केंद्र असल्याने सुरक्षेच्या दुष्टीकोनातून सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक देवेंद्र शिंदे ,हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातर्फे गावातून पथ संचलन करण्यात आले.

ब्राह्मणगावी पोलिसांतर्फे पथ संचलन
बागलाण तालुक्यातील लखमापूर व ब्राह्मणगाव ही दोन्ही गावे निवडणुकीबाबत अतिसंवेदनशील असून जिल्ह्याच्या राजकारणाची वाट या दोन्ही गावातून जाते.निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुपारी बारा वाजता लखमापूर व एक वाजता ब्राह्मण गाव येथे पोलिस पथकाचे संचलन करण्यात आले.