शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

मनमाड स्थानकात खोळंबले प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2022 11:43 PM

मनमाड : मध्य रेल्वेच्या मनमाड ते इगतपुरी या अतिशय व्यस्त असलेल्या लोहमार्गावर देवळाली ते लहवित स्थानका दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते मुझफ्फरपूर पवन एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली.

ठळक मुद्देलांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

मनमाड : मध्य रेल्वेच्या मनमाड ते इगतपुरी या अतिशय व्यस्त असलेल्या लोहमार्गावर देवळाली ते लहवित स्थानका दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते मुझफ्फरपूर पवन एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. या अपघातामुळे मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या डाऊन मार्गाच्या अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर खोळंबून होत्या, तर लांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.अपघाताचे वृत्त मनमाड येथे येताच मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून अपघातग्रस्त यातायात ट्रेन घटनास्थळी मार्गस्थ झाली. त्याचबरोबर मनमाड रेल्वे रुग्णालयाचे वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जंक्शन स्थानक असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला.पवन एक्सप्रेस इगतपुरी येथून सुटल्यानंतर नाशिक - मनमाडकडे येत असताना लहवित ते देवळाली रेल्वे स्थानक दरम्यान पवन एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरून मोठा अपघात घडला. अपघात घडताच मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात धोक्याचा इशारा देणार सायरन वाजविण्यात आले. त्यानंतर मनमाड रेल्वे जंक्शन परिसरात कार्यरत असलेली अपघात रिले ट्रेन व वैद्यकीय पथक मनमाड येथून घटनास्थळी मार्गस्थ झाले.या अपघातामुळे मुंबईहून मनमाडकडे येणाऱ्या डाऊन मार्गावरील अनेक गाड्या अनेक रेल्वे स्थानकांमध्ये खोळबंल्या होत्या. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले. या अपघातामुळे काही गाड्या रद्द केले, तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलcent

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेAccidentअपघात