रस्त्यावर पार्क केलेल्या कार चोरट्यांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 15:02 IST2019-01-02T14:59:57+5:302019-01-02T15:02:29+5:30
नाशिक : शहरातील विविध ठिकाणी पार्क केलेल्या पाच कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ गंगापूर रोड, बिग बझार, खतीब डेअरी व तिबेटीयन मार्केट या परिसरात या घटना घडल्या असून चोरट्यांनी पार्क केलेल्या कारवर लक्ष केंद्रीत केल्याचे या घटनांमुळे समोर आले़

रस्त्यावर पार्क केलेल्या कार चोरट्यांच्या रडारवर
नाशिक : शहरातील विविध ठिकाणी पार्क केलेल्या पाच कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ गंगापूर रोड, बिग बझार, खतीब डेअरी व तिबेटीयन मार्केट या परिसरात या घटना घडल्या असून चोरट्यांनी पार्क केलेल्या कारवर लक्ष केंद्रीत केल्याचे या घटनांमुळे समोर आले़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि़१) रात्री आठ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तिबेटीयन मार्केट, बिग बझार, खतीब डेअरी तसेच चोपडा लॉन्स या परिसरात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून चोरी केली़ चोपडा लॉन्स येथे पार्क केलेल्या अल्टो कारची (एमएच १५ डीएस ८२२०) काच फोडून गाडीचे आरसी बुक, पॅनकार्ड व मतदान कार्ड चोरून नेले़ एमएच १५ जीएल ६००० या कारमधून बँकेचे पासबुक, डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, खतीब डोरीसमोरील होंडा सिटी कारमधून (एमएच १५, ईपी ७३१९) वीस हजार रुपयांचा लॅपटॉप, तिबेटीयन मार्केटजवळील वॅगनर कारमधून (एमएच १५, डीएस ६५०३) डेल कंपनीचा लॅपटॉप तर बिग बझारजवळील ब्रिझा कारमधून (एमएच ४६, एयू ३०७१) चोरट्यांनी पॅन कार्ड, डेबिट कार्ड व आरसी बुक चोरून नेले आहे़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़