परीट-धोबी समाज संघटनेत फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:59 IST2018-09-07T23:16:06+5:302018-09-08T00:59:16+5:30
कसबे-सुकेणे : परिट-धोबी समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेत फूट पडली असून, राज्यातील समाजबांधवांच्या भावनांचा आदर व आरक्षणाचा प्रश्न सुटावा याकरिता जोमाने संघटन व्हावे, यासाठी आम्ही राज्यपातळीवर नवी संघटना कार्यरत करीत असल्याची घोषणा शुक्रवारी नागपूर येथील समाजाचे ज्येष्ठ नेते देवराज सोनटक्के व अकोल्याचे अनिल शिंदे यांनी नाशिकमध्ये केली.

परीट-धोबी समाज संघटनेत फूट
कसबे-सुकेणे : परिट-धोबी समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेत फूट पडली असून, राज्यातील समाजबांधवांच्या भावनांचा आदर व आरक्षणाचा प्रश्न सुटावा याकरिता जोमाने संघटन व्हावे, यासाठी आम्ही राज्यपातळीवर नवी संघटना कार्यरत करीत असल्याची घोषणा शुक्रवारी नागपूर येथील समाजाचे ज्येष्ठ नेते देवराज सोनटक्के व अकोल्याचे अनिल शिंदे यांनी नाशिकमध्ये केली.
नाशिक येथील गंगापुर रोडवरील बालाजी लॉन्सवर परिट- धोबी समाजाची प्रदेश कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटनेतील अंतर्गत मतभेद, प्रदेशाध्यक्ष यांच्या कडुन मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून व समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आणि समाज संघटन बळकटपणे व्हावे, सध्याच्या प्रदेशाध्यक्षाांबद्दल राज्यभर असलेली नाराजी आणि राज्यातील समाजबांधवांच्या मागणी नुसार या संघटनेला रामराम ठोकत विदर्भातील जेष्ठ नेते देवराज सोनटक्के, आरक्षण कृती समितीचे अनिल शिंदे, दिलीप शिरपूरकर, रु पेश मोतीकर, पुण्याचे कुमार शिंदे , नाशिकचे मनोज म्हस्के, मुंबईचे रविंद्र जाधव, वर्धाचे अशोक लोणकर, अमरावतीच्या वैशाली केळझरकर यांनी प्रदेश कार्यकारीणी बैठकीत राजीनामे देत सोमेश्वर मंदिरात नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा केली. सर्व भाषीक परीट- धोबी समाजाचे आगामी काळात संघटन करीत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सुटावा याकरीता प्रयत्नशील राहु, असे प्रतिपादन यावेळी देवराज सोनटक्के यांनी व्यक्त केले.
यावेळी हरीश मस्के, मनोज दुधांडे, चंद्रकांत थुकेकर , सुनील पवार, सचिन कदम, चेतन शिंदे, अरु णा रायपुरे ,गणेश खर्चे , महादेव इडोकार ,अजय सोनोने , दिलीप बोरसे ,विवेक पवार, मराठा परिट समाज सेवा मंडळाचे संजय राजगिरे, कैलास गवळी, सुधाकर रंधे, भानुदास गायकवाड आदी उपस्थित होते.
मराठा-परिट समाजाचे समर्थन नाशिकमधील सर्वात मोठ्या मराठा-परिट समाज सेवा मंडळाने नवीन संघटना घोषणेचे स्वागत करीत देवराज सोनटक्के व अनिल शिंदे यांचा सत्कार केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश मराठा परिट समाज सोनटक्के व शिंदे यांच्या नेतृत्वाला समर्थन देत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत राऊत, महासचिव विलास जोवेॅकर यांनी दिली.