लोखंडेवाडीच्या जनता विद्यालयात पालक-शिक्षक संघाचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:03 PM2019-07-08T18:03:15+5:302019-07-08T18:03:47+5:30

दिंडोरी : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोखंडेवाडी येथील जनता माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला . अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष जनार्दन उगले होते .

 Parent-Teacher Association Meet in Lokhandwadi Janata Vidyalaya | लोखंडेवाडीच्या जनता विद्यालयात पालक-शिक्षक संघाचा मेळावा

लोखंडेवाडीच्या जनता विद्यालयात पालक-शिक्षक संघाचा मेळावा

googlenewsNext

मुख्याध्यापक आर. सी. वडजे यांनी पालक शिक्षक संघाची रचना व कार्य यांचे महत्त्व पालकांना समजावून सांगितले . विद्यार्थांच्या सर्वागीण विकासासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी असे आवाहन करुन शाळेच्या अडचणी व समस्या विषद केल्या व पालकांना शाळेसाठी मदतीचे आवाहन केले . याप्रसंगी शालेय समिती सदस्य सचिन उगले उपस्थित होते. यावेळी पालक- शिक्षक संघाची निवड करण्यात आली. पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणून सुभाष वाघ व सहसचिव नवनाथ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच पालकांमधून सदस्यांची निवड करण्यात आली . नवनियुक्त पालक- शिक्षक सदस्यांचे स्वागत उगले व वडजे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचलन सी. एस. चौधरी यांनी केले.

Web Title:  Parent-Teacher Association Meet in Lokhandwadi Janata Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा