शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

भादवण परिसरात बिबट्याची दहशत ग्रामस्थ भयभीत : वनविभागाकडे तातडीने पिंंजरा लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:13 AM

पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गव्हाळी शिवारात गुरुवारी पहाटे मेंढपाळाच्या शिंगराचा बिबट्याने फडशा पाडला.

पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गव्हाळी शिवारात गुरुवारी पहाटे मेंढपाळाच्या शिंगराचा बिबट्याने फडशा पाडला असून, मोकाट बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे. भादवण येथील माजी उपसरपंच व्यंकट शंकर जाधव यांच्या गव्हाळी शिवारातील गट नं. २०७ मधील शेतात कांदा पात चरण्यासाठी आलेल्या मेंढपाळाच्या कळपातील दोन वर्षाच्या शिंगरावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शिंगराचा मृत्यू झाला. दि. २५ ला रात्री २ च्या सुमारास व्यंकट शंकर जाधव यांच्या पिळकोस-बगडू पुलाजवळील गवाळी मळ्यातील शेतात टिपे, ता. मालेगाव येथील मेंढपाळ धनराज अण्णा ठोंबरे हे तळ ठोकून होते. रात्री २ वाजता बिबट्याने मेंढपाळाच्या कळपातील मोकळ्या असणाऱ्या शिंगरावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने मेंढ्या बिथरल्याने मेंढपाळ जागे झाले; मात्र या मेंढपाळाचे शिंगरूबिबट्याने ओढून नेऊन फस्त केले. बिबट्याच्या धाकाने मेंढपाळानी ती रात्र जागून काढली. नागरिकांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे.