मुंबईतील पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी पंचवटी, गोदावरी एक्सप्रेस रद्द 

By संजय पाठक | Updated: July 8, 2024 12:33 IST2024-07-08T12:32:55+5:302024-07-08T12:33:07+5:30

रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

Panchvati Godavari Express canceled for second consecutive day due to rain in Mumbai  | मुंबईतील पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी पंचवटी, गोदावरी एक्सप्रेस रद्द 

मुंबईतील पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी पंचवटी, गोदावरी एक्सप्रेस रद्द 

संजय पाठक, नाशिक- मुंबई येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून आज सलग दुसऱ्या दिवशी पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. या रेल्वे नाशिक रोड येथून पुढे गेल्यानंतर इगतपुरी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या तसेच प्रवाशांना रेल्वे पुढे जाणार नसल्याची कल्पना देण्यात आली आहे.

सध्या नाशिक- मुंबई महामार्गावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान नाशिक- मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईला बैठक बोलावली आहेत. तर शिंदे सेनेच्या विलहोळी येथे दुपारी रास्ता रोको आंदोलन माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.

Web Title: Panchvati Godavari Express canceled for second consecutive day due to rain in Mumbai