पळसनला ट्रॅक्टरखाली सापडून शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:44 IST2021-02-08T19:53:43+5:302021-02-09T00:44:28+5:30
सुरगाणा : तालुक्यातील आमदा पळसन जवळील पुलावर ट्रॅक्टरखाली सापडून चालक शेतकरी चंद्रकांत योगीराज बागुल (३५) रा.हस्ते ठार झाला.

पळसनला ट्रॅक्टरखाली सापडून शेतकरी ठार
स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टर बाजूला करून त्यास सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी सुरेश पांडुळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. दोघे जण ट्रॅक्टर घेऊन कामानिमिताने उंबरठाणकडे जात असताना, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रॉलीत बसलेला यशवंत चंदर वाघमारे यास गंभीर दुखापत झाली असून, त्याला पळसन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.