मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथांची पालखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:08 PM2021-02-08T17:08:23+5:302021-02-08T17:09:07+5:30

त्र्यंबकेश्वर : षट‌्तिला एकादशीला वारकऱ्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर सोमवारी (दि.८) भागवत एकादशीला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा मुखवटा ठेवून पालखी मिरवणूक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष सागर उजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

Palkhi of Nivruttinath in the presence of few devotees | मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथांची पालखी

मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथांची पालखी

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : भागवत एकादशीनिमित्त समाधीची पूजा

त्र्यंबकेश्वर : षट‌्तिला एकादशीला वारकऱ्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर सोमवारी (दि.८) भागवत एकादशीला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा मुखवटा ठेवून पालखी मिरवणूक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष सागर उजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथांची यात्रा प्रशासनाने रद्द केली. त्यामुळे यंदा त्र्यंबकेश्वरी हजारो दिंड्यांचा होणारा गजर कानी पडला नाही. पहिल्या दिवशी षट‌्तिला एकादशीला दर्शन रांगेतील एका भाविक वारकऱ्याच्या हस्ते समाधीची पूजा करण्यात आली, तर सोमवारी (दि.८) नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सागर उजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे, नगरसेवक कैलास भुतडा यांचेसह प्रशासकीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

भाविकांचा हिरमोड
यंदा संत निवृत्तीनाथ मंदीर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आसुसलेले वारकरी भाविक खट्टू झाले. बॅरिकेटिंगच्या आडून का होईना, तेथे ठेवलेल्या तसबिरीचे दर्शन घेऊन अनेक वारकऱ्यांनी दर्शन घेतले. या वर्षी दोन एकादशी असल्याने दोन दिवस यात्रा पार पडली. यात्राच नसल्याने व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. ज्यांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मालाचा साठा करून ठेवला होता. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

फोटो- ०८ त्र्यंबक यात्रा

Web Title: Palkhi of Nivruttinath in the presence of few devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.