शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार अतिवृष्टीमुळे भातपीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:50 IST

इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून, कवडदरा, घोटी खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी राऊतसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केली. सध्या भात सोंगणी हंगाम सुरू झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी; सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

कवडदरा : इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून, कवडदरा, घोटी खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी राऊतसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केली. सध्या भात सोंगणी हंगाम सुरू झाला आहे. दसरा, दिवाळी सण तोंडावर आला असून, करपा, मावा, तुडतुडे, टाका आदी रोगांमुळे आधीच नुकसान झालेल्या भातपिकाची ढगाळ हवामान व अधूनमधून बरसणाऱ्या अवकाळीमुळे भातपीक सोंगावे की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सोयाबीनदेखील काढणीला आले असून, काही शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले भातपीक तसेच सोयाबीन पावसाने भिजले आहे, तर सोंगलेला भात सडण्याची स्थिती निर्माण झाली असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जातो की काय या विचाराने शेतकरी धास्तावला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच विमा कंपन्यांनीही सरसकट पीकविमे मंजूर करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  यावेळी भाजप इगतपुरी तालुका उपाध्यक्ष रमेश निसरड, घोटी खु. सरपंच कैलास फोकणे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ रोंगटे, भाऊराव रोंगटे, सावळीराम रोंगटे, विशाल भोईर, सुरेश बर्डे, भास्कर रोंगटे, संतोष रोंगटे, बाळू रोंगटे, बाळासाहेब कलवर, सतीश फोकणे, चंद्रभान फोकणे, सुभाष फोकणे, तुकाराम शिंगोटे, शरद फोकणे, रुंजा फोकणे उपस्थित होते.

राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार अतिवृष्टी होत आहे. यामुळे आधीच रोगराईमुळे खराब झालेले शेतातील भात अतिवृष्टीमुळे पूर्णत; पाण्यात बुडाले, तर सोंगणीयोग्य असलेले भाताचे उभे पीक आडवे पडले असून, यात भातपिकाची नासाडी झाल्याने शेतकरी मात्र धास्तावले आहेत. पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी कमी पाण्यावर येणारा हळा भात सोंगावा की पंचनामा होईपर्यंत वाट पहावी हाही प्रश्न उभा राहिला आहे. सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी.- रमेश निसरड, नुकसानग्रस्त शेतकरी 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी