Oztar was killed in a two-wheeler accident on Maltruck | अंगावरून मालट्रक गेल्याने ओझरला दुचाकीस्वार ठार

अंगावरून मालट्रक गेल्याने ओझरला दुचाकीस्वार ठार

ओझर टाउनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील गायखे पेट्रोलपंपासमोर दुचाकी (अ‍ॅक्टिव्हा) वाहनास मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अ‍ॅक्टिव्हा स्वार जागीच ठार झाला.
बुधवारी (दि.१६) पहाटे एक ते सव्वा वाजेच्या सुमारास शिरवाडे वणी येथील संदीप पी. खैरे (२८) हा जोडीदारासमवेत मेरी येथील काम आटोपून त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाने (एम एच १५ जी ई ५५५७) नाशिकहून शिरवाडे वणी येथे ओझर येथील सर्व्हिसरोडने जात असताना त्याच सुमारास महामार्गाने नाशिककडून येणाऱ्या मालट्रकने (एमएच १५, सीके ५३७४) गायखे पेट्रोल पंपासमोर सर्व्हिसरोडकडे वळत असलेल्या अ‍ॅक्टिव्हाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर दुचाकीवरील संदीप खैरे याच्या पोटावरून मालट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खैरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर ओझर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला .

Web Title: Oztar was killed in a two-wheeler accident on Maltruck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.