ओझरला अल्पवयीन मुलीने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:03 IST2020-06-22T21:42:59+5:302020-06-22T23:03:42+5:30
ओझर : येथील सरकारवाडामध्ये राहणाऱ्या एका सोळा वर्षीय मुलीने घरातील अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सदर घटना सोमवारी (दि. २२) दुपारी १२.५० वाजेपूर्वी घडली.

ओझरला अल्पवयीन मुलीने संपविले जीवन
ओझर : येथील सरकारवाडामध्ये राहणाऱ्या एका सोळा वर्षीय मुलीने घरातील अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सदर घटना सोमवारी (दि. २२) दुपारी १२.५० वाजेपूर्वी घडली.
येथील सरकारवाड्यातील सुतार गल्लीत राहणाºया गायत्री उर्फ ममता सिद्बोधन गायकवाड (१६) हिने घरातील अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिची आई छाया गायकवाड यांनी तिला औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावर्षी गायत्रीने दहावीची परीक्षा दिलेली होती. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे , सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड,योगिता बोरील ,खोटरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
व मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगांव येथील रूग्णालयात पाठविला. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.