शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार प्रकरणांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:29 IST

भ्रष्टाचार प्रकरणी सादर झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरणाचा अहवाल मागितला जातो, मात्र अधिकाºयांच्या दिरंगाईमुळे २० पेक्षा अधिक प्रकरणे केवळ अहवालाअभावी पडून असल्याची बाब भ्रष्टाचार निर्र्मूलन समितीच्या बैठकीत समोर आली. याप्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी संबंधितांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देदिरंगाई : अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : भ्रष्टाचार प्रकरणी सादर झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरणाचा अहवाल मागितला जातो, मात्र अधिकाºयांच्या दिरंगाईमुळे २० पेक्षा अधिक प्रकरणे केवळ अहवालाअभावी पडून असल्याची बाब भ्रष्टाचार निर्र्मूलन समितीच्या बैठकीत समोर आली. याप्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी संबंधितांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.दर तीन महिन्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते. सोमवारी झालेल्या बैठकीत मागील चार वर्षांत दाखल झालेल्या ५० पेक्षा अधिक तक्रारीं समोर ठेवण्यात आल्या होत्या. मात्र अनेक प्रकरणांमध्ये अद्यापही अहवाल सादर होत नसल्याने प्रकरणे निकालीअभावी पडून असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध शासकीय विभागातील सुमारे ३१ कोटी २५ लाख ६६ हजार रुपयांच्या प्रशासकीय भ्रष्टाचार प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.भ्रष्टचारप्रकरणी आणखी काही नव्याने प्रकरणे दाखल झाली आहेत. नाशिक मनपामधील द्विनोंद घोटाळा, जिल्हा परिषदेच्या घोटी बुद्रूक येथील ऊर्दू शाळेतील पटसंख्या खोटी दाखवून मुख्याध्यापक व शिक्षकांनी लाटलेले गणवेश अनुदान प्रकरण, येवला तालुक्यातील मुरमी गामपंचायतीमधील कामात झालेला भ्रष्टाचार, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत तक्रारी दाखल झाल्या. तसेच जिल्हा परिषदेच्या भरतीत झालेला घोटाळा, जिल्हा रुग्णालयाच्या औषध खरेदी प्रकरणात ५१ लाख ५० हजार रुपयांचे भ्रष्टाचार, आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्प कार्याेलयात ३५ लाखांचा झालेला रेनकोट घोटाळा, मुक्त विद्यापीठात प्राध्यापक, शिक्षक आणि इतरपदांवर बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणाबाबतही चर्चा करण्यात आली. यांसारख्या अनेक प्रकरणांमध्ये अहवाल सादर होत नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे याप्रकरणांवर अहवालसादर झाल्यानंतर ही प्रकरणे प्राधान्यांनी निकाली काढली जाणार आहेत.अधिकाºयांकडून अहवाल सादर करण्याबाबत दिरंगाई होत असल्याने तक्रारकर्त्यांकडून प्रशासकीय कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली जाते.तीस तक्रारींवरून झाली चर्चासमितीकडे प्राप्त झालेल्या २७ तक्र ारी निकाली काढण्यात आल्या आहेत, तर २० पेक्षा अधिक तक्र ारींमध्ये अद्याप अहवालच सादर करण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली. बैठकीत प्राप्त तक्रारींवर चर्चा करून संबंधित अधिकाºयांकडून त्या प्रकरणाचा अहवाल मागितला जातो. बैठकीत दाखल झालेल्या दोन व अगोदरच्या २८ अशा एकूण ३० तक्रारींवर चर्चा होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.शासकीय विभागातील सुमारे ३१ कोटी २५ लाख ६६ हजार रुपयांच्या प्रशासकीय भ्रष्टाचार प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.महसूल, झेडपीतअधिक प्रकरणेगेल्या चार वर्षांत तब्बल वीसहून अधिक भ्रष्टाचाराच्या तक्रार अर्जांमध्ये अहवाल सादर झाला नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात २०१३ पासून एकूण ४९ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी या जिल्हा परिषद आणि महसूल विभागाशी संबंधित आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारी