शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

उधळले महाशिवआघाडीचे मनसुबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:30 AM

बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.

नाशिक : बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.शिवसेनेला सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या दहा ते बारा फुटिरांची साथ होती, तर त्यांना प्रामुख्याने कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि मनसेचे पाठबळ मिळणार होते. त्यातील मनसेला सुरुवातीपासूनच बाजूला ठेवण्यात भाजपला यश मिळाले होते. त्यासाठी राज ठाकरे यांच्याशी भाजपच्या प्रदेश नेत्यांनी चर्चा केली आणि त्यांना यश मिळाले. राज ठाकरे यांनी निवडणुकीत भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळेल किंवा नाही याविषयी शंका होती.मनसेपाठोपाठ भाजपने कॉँग्रेसला गळाला लावण्यासाठी चर्चा केली. त्यांना उपमहापौरपदासाठी आमिष दिल्याने वातावरण बिघडवले. मुळातच कॉँग्रेस पक्षात दोन गट होते. त्यातच उपमहापौरपदाच्या वादावरून सेना आणि कॉँग्रेसमध्ये बिनसले अखेरीस कॉँग्रेसने सेनेला सोडून भाजपला पूरक भूमिका घेतली. सर्वांत मोठी बंडखोरांची अडचणदेखील सोडविण्यात यश आले.साम-दाम-दंड-भेद नितीचा वापरभाजपने बंडखोरांना चुचकारले. साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर केला खरा, परंतु शिवसेनेचे गणित जुळत नसल्याने मूळ पक्षाशी प्रतारणा करून कारवाईला सामोरे जावे लागण्यापेक्षा पक्षाबरोबर राहिल्याचे फळ मिळेल असे बंडखोरांना समजावण्यात आल्याने प्रश्न मिटला.सानप यांच्याशीही भाजपची चर्र्चाभाजप सोडून शिवसेनेत गेलल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांना त्यांच्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठीच त्यांनी बंडाची तयारी करण्यास नगरसेवकांना सांगितले. मात्र, भाजपच्या नेत्यांनी सानप यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.उमेदवारीमुळेच भाजपतील बंड झाले थंडमनपा निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या संभाव्य नगरसेवकांची संख्या दहा ते बारा असल्याचे सांगितले जात होते. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करताना सानप समर्थक नगरसेवक कमलेश बोडके यांनी तर थेट शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी (दि.२२) ते थेट भाजपतच असल्याचा दावा करू लागले. भाजपात बाहेरून आलेल्यांनाच सत्तापदे दिली जात आहे. पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी होती आणि ती पूर्ण झाल्याने भाजपबरोबरच असल्याचा दावा बोडके यांनी केला. निवडणुकीच्या वेळी बोडके, मच्छिंद्र सानप आणि तत्सम सर्वच कथित बंडखोर नगरसेवक एकाच वेळी दाखल झाले.सर्वच पक्षांतराजी-नाराजीचे वातावरणमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांत गटबाजीचे वातावरण होते. भाजपने ज्येष्ठ नगरसेवकाला न्याय दिल्याचे स्वागत होत असताना काही नगरसेवक उमेदवारीत डावलल्याने नाराजी व्यक्त करीत होते, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये पाठिंबा शिवसेनेला द्यायचा की भाजपला यावरून दोन गट पडले होते. एका गटाने दुसºया नगरसेवकांना अंधारात ठेवून बोलणी केल्याने त्याविषयीचे पडसाद पक्षात उमटले. मनसेतदेखील भाजपला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस