नदीपात्रात अडकलेल्यांना काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:26 IST2019-05-09T00:25:53+5:302019-05-09T00:26:14+5:30
सायखेडा : चेहेडी येथे नदीपात्रालगत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह अडकलेल्या मुलांना चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीची टीमने सुखरूप बाहेर काढले.

चेहेडी येथे नदीपात्रात अडकलेल्या महिलेसह तीन मुलांना चांदवड येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले.
सायखेडा : चेहेडी येथे नदीपात्रालगत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह अडकलेल्या मुलांना चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीची टीमने सुखरूप बाहेर काढले.
नदीपात्रात साचलेल्या पाण्यात, कपडे धुण्यासाठी चेहेडी येथील मंगल रवींद्र पवार या गेल्या होत्या. त्यांच्या सोबत मुलगी प्रमिला, मुले समाधान व रोशन असताना, नदीला आलेल्या पाण्यात हे सर्व अडकले. महिलेने आरडाओरड केल्याने नदीकाठावर असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने, पोलीसपाटील केशव रुमणे यांनी घटनेची माहिती सायखेडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना दिली.
चांदोरी येथील आपत्कालीन व्यवस्थापन समितीशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली, त्यानंतर लगेचच आपत्ती व्यवस्थापन समितीची टीम सागर गडाख, शुभम गारे, फकीरा धुळे, बाळू आंबेकर आदींनी घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात अडकलेल्या महीलेसह तीच्या तीन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी प्राथमीक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, डॉ. घोडेकर, दिगंबर कमानकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.