शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान जनजागृतीसाठी पायी प्रचार वारी

By admin | Updated: January 3, 2017 01:36 IST

देशपांडे दाम्पत्याचा उपक्रम : नाशिक ते आनंदवन ११०० किलोमीटरची पदयात्रा

सातपूर : नागरिकांमध्ये अवयवदानाचे महत्त्व वाढीस लागावे म्हणून अंबड रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक सुनील देशपांडे हे सपत्नीक नाशिक ते आनंदवन या ११०० किलोमीटर अंतराच्या पायी अवयवदानवारीला निघालेले आहेत. वारी दरम्यानच्या गावांमध्ये देशपांडे दाम्पत्य अवयवदानाविषयी प्रचार, प्रसार करीत आहेत.  अवयवदान करण्याची लोकांची इच्छा आहे, परंतु त्यांना फारशी माहिती नाही. अवयवदानाविषयी लोकांच्या मनात भ्रामक कल्पना आहेत. या भ्रामक कल्पना दूर करून लोकांनी अवयवदान करावेत. याबाबत जनजागृती झाल्यास या चळवळीला बळ प्राप्त होणार आहे. ही चळवळ वाढीस लागल्यास तामिळनाडूपेक्षा अवयवदानात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.  मनुष्य साधारणपणे ११ प्रकारचे अवयवदान करू शकतो. प्रत्येकाच्या मनात अवयवदानाचे महत्त्व वाढावे म्हणून सुनील देशपांडे, रंजना  देशपांडे, प्रियदर्शन बापट हे १४ नोव्हेंबरपासून अवयवदान वारीला निघालेले आहेत. नाशिक ते आनंदवन या पायी अवयवदान वारीमुळे लोकांच्या मनात अवयवदानाची जागरूकता निर्माण होईल, असा आशावाद देशपांडे यांनी ठिकठिकाणी व्यक्त केला आहे.  तर देशपांडे यांच्या या उपक्रमाचे देखील ठिकठिकाणी स्वागत होत आहे. या अवयवदान वारीला तुलसी आय हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे. (वार्ताहर)