अवयवदान जनजागृती : धावले हजारो नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 04:48 PM2019-07-21T16:48:36+5:302019-07-21T16:50:35+5:30

शुभारंभाप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘मेट’च्या संचालक शेफाली भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून रनला सुरुवात केली.

Organ donetion Public awareness: Runs of Thousands Nashikites | अवयवदान जनजागृती : धावले हजारो नाशिककर

अवयवदान जनजागृती : धावले हजारो नाशिककर

Next
ठळक मुद्दे८६ वर्षांचे आजोबा अन् विशेष विद्यार्थ्याने वेधले लक्षप्रबोधनपर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

नाशिक : अवयवदान जनजागृती व नोंदणी प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी शेकडो नाशिककर आबालवृद्धांनी ‘रन फॉर आर्गन’मध्ये सहभागी होऊन तीन किलोमीटरपर्यंत धाव घेतली. दरम्यान, सहभागी काही विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
स्वराज फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.२१) सकाळी ‘रन फॉर आर्गन’ हा उपक्र म आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शुभारंभाप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘मेट’च्या संचालक शेफाली भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून रनला सुरुवात केली. तत्पूर्वी सहस्त्रनाद, महिलांचे ढोल पथक, विविध संस्थांचे बँड पथक, लेजीम पथक यांनी प्रात्यक्षिके करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच सुषमा दुग्गड यांचे हास्यक्लब व सई संघवी यांचे झुम्बा प्रात्यक्षिक आकर्षण ठरले.
‘रन फॉर आॅर्गन’मध्ये शेकडो तरुण, तरुणींसह वृद्धांनीही नोंदणी करत सहभाग घेतला. दरम्यान, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सौंदर्यवती नमिता कोहोक, नाशिक जिल्हा क्रि केट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा,  धावपटू मोनिका आथरे, बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुदगल, मोतीवाला कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर स्वानंद शुक्ला, नगरसेवक समिना मेमन, डॉ. विक्रांत जाधव, अ‍ॅड. आकाश छाजेड आदी मान्यवरांनी सहभाग घेत सहभागी नाशिककरांचा उत्साह वाढविला. प्रारंभी संयोजक योगीता खांडेकर यांनी उपस्थिताना रनची संकल्पना समजावून सांगितली. सहभागी नागरिकांना फाउंडेशनकडून पदक प्रदान करण्यात आले.

८६ वर्षांचे आजोबा अन् विशेष विद्यार्थ्याने वेधले लक्ष
रन फॉर आर्गन या उपक्रमात एक ८६ वर्षीय डॉ. सुब्रमण्यम व स्वयम पाटील या विशेष विद्यार्थ्याने सहभागी होऊन ऊर्जा वाढविली. नियतीने जरी व्यंग दिले असले तरी त्यावर जिद्दीने मात करता येते, हे स्वयमने दाखवून देत अवयवदान जनजागृतीसाठी आपला सहभाग नोंदविला. नाशिक केंब्रिज हायस्कूल, मोतीवाला मेडिकल कॉलेज, ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वाद्य वाजवून व लेजीमचे प्रात्यक्षिक सादर केले.
---

 

Web Title: Organ donetion Public awareness: Runs of Thousands Nashikites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.