हरणबारी उजवा व केळझर कालव्याच्या सर्व्हेक्षणाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:14 PM2018-09-25T13:14:33+5:302018-09-25T13:14:57+5:30

सटाणा:हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिले असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपीका चव्हाण यांनी दिले.

 Order for surveillance of the pelvic right and calcareous canal | हरणबारी उजवा व केळझर कालव्याच्या सर्व्हेक्षणाचे आदेश

हरणबारी उजवा व केळझर कालव्याच्या सर्व्हेक्षणाचे आदेश

Next

सटाणा:हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिले असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपीका चव्हाण यांनी दिले. या संदर्भात चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम वाहिनी नदी खाऱ्यातून गुजरातकडे वाहून जाणारे वळण योजनांद्वारे उपलब्ध झालेले क्र . ५३.०२ दलघपू पाणी हरणबारी व केळझर वाढीव कालव्यासाठी उपलब्ध झाले आहे. बागलाण तालुका हा अवर्षण प्रवण तालुका आहे. सततच्या दुष्काळी परिस्थिीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरी आत्महत्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने पश्चिम वाहिनी नदी खोºयातुन गुजरातकडे वाहुन जाणारे वळण योजनांचे ५३.०२ दलघपु पाणी हरणबारी वाढीव उजवा कालवा पारनेर ते सातमाने व केळझर वाढीव कालवा क्र .आठ मुळाणेपासुन वायगांव पर्यंत मिळावे अशी मागणी केली होती. या अनुषंगाने विधानमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. यामुळै हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्र . आठच्या कामांचे सर्व्हेक्षण करण्यात यावी अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिले असता त्यांनी तातडीने प्रधान सचिव यांना सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत.

Web Title:  Order for surveillance of the pelvic right and calcareous canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक