शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:24 IST

बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्र मांक आठ साठी राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान करत ४ कोटी ९७ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असतानाच केळझर वाढीव चारी क्र मांक आठ सह प्रलंबित हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जलसिंचन विभागाने दिल्याची माहिती धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिल्याने दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : अवर्षणप्रवण बागलाणपूर्वला होणार फायदा

सटाणा : बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्र मांक आठ साठी राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान करत ४ कोटी ९७ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असतानाच केळझर वाढीव चारी क्र मांक आठ सह प्रलंबित हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जलसिंचन विभागाने दिल्याची माहिती धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिल्याने दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.केळझर चारी क्र मांक आठ च्या शून्य ते बारा किलोमीटर पर्यंत (भाक्षी-मूळाने पर्यंत) चा मार्ग यापूर्वीच मोकळा झालेला असतांना आता त्यापुढील चौगाव,कर्हे,अजमिर सौंदाणे, सुराणे, देवळाणे येथील सर्वेक्षणाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली असून या वाढीव कालव्यासाठी १४ दलघफु पाणी आरक्षण करण्यासाठी आपण किटबध्द असल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.शासनाने मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारलेल्या बागलाण तालुक्यातील बहुचर्चित हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्याव्यतिरिक्त ३८ दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरक्षित केला असून हरणबारी उजव्या कालव्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने सबंधित अधिकाºयांना दिल्याने पारनेर, बिजोटे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, फोफिर, खीरमाणे, कोटबेल, कुपखेडा, नामपूर परिसर, नळकेस,सारदे, रामतीर, रातीर, सुराणे, देवळाणे, वायगा, काकडगाव,द्याने,आसखेडा,सातमाणे गावांच्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.केळझर वाढीव चारी क्र मांक आठ आणि हरणबारी उजव्या कालव्याचे सर्वेक्षण करण्याचे लेखी आदेश जलसंपदा विभागाने बुधवारी दिले. दोन्ही कालव्यांच्या सर्वेक्षणासाठी कमी कालावधीच्या निविदा प्रसिध्द करून लाभक्षेत्रातील एकही गाव टळणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जाणार असल्याचे डॉ.सुभाष भामरे म्हटले आहे.केळझर वाढीव चारीक्र मांक आठच्या माध्यमातून मुळाणे येथील स्मशानभूमीलगतच्या धरणात पाणी टाकण्याचे देखील नियोजन करण्यात येणार असून लवकरच दोन्ही प्रलंबित कालव्यांच्या कामाला सुरु वात करणार असल्याची ग्वाही डॉ.भामरे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान भामरे यांनी सिंचन प्रकल्प प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन बागलाण वासियांना दिलेले होते. हरणबारी उजव्या कालव्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणार्या बागलाण तालुक्यातील पारनेर, बिजोटे, आखतवाडे, आसखेडा ,गोराणे, आनंदपूर, द्याने ,फोफिर, खीरमाणी, कोटबेल, कुपखेडा,नामपूरपरिसर, नळकेस,सारदे,काकडगाव ,रामतीर, रातीर, सुराणे, देवळाणे, वायगाव, सातमाणे गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाचा प्रश्न मिटणार आहे तर चारी क्र मांक आठ च्या शून्य किलोमीटर पासून बारा किलोमीटर पर्यंत (भाक्षी-मूळाने पर्यंत) चा मार्ग आता मोकळा झालेला असताना आता त्यापुढील चौगाव,कºहे,अजमिर सौंदाणे, सुराणे, देवळाणे येथील वाढीव चारी क्र मांक आठ च्या सर्वेक्षणाचे लेखी आदेश निघाल्याने पुढील मार्ग सुखकर झाला आहे.-----------------------------केळझर चारी क्र मांक आठ साठी यापूर्वीच शासनाने मंजूर केलेल्या ४ कोटी ९७ लाखांच्या निधीतून केळझर चारी क्र मांक आठ च्या कान्हेरी नदीवरील पाईपलाईनसाठी ८२ लाख रु पयांचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचे देखील डॉ.भामरे यांनी स्पष्ट करत केळझर वाढीव चारी क्र मांक आठ च्या सर्वेक्षणाचे आदेश जलसंपदा विभागाने काढल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.केळझर चारी क्र मांक आठ चा प्रश्न गत पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होता.हा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा तत्कालीन शासनाने मारला होता तसेच या कालव्याचे सर्वेक्षण एका शेतकºयांच्या शेतातून व प्रत्यक्ष कालवा दुसर्याच शेतातून असे चुकीचे सर्वेक्षण यापूर्वी करण्यात आले होते मात्र यातून आम्ही मार्ग काढून सतत पाठपुरावा करून गत अनेक वर्षांपासूनची शेतकर्यांची केळझर चारी क्र मांक आठ चे काम सुरु करण्याची मागणी पूर्ण केली असून आता केळझर वाढीव चारी क्र मांक आठ सह हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश निघाल्याने शेतकºयांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प